महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे का? गावबंदीच्या मुद्द्यावरून भुजबळांचा जरांगेंना सवाल

  • Written By: Published:
महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे का? गावबंदीच्या मुद्द्यावरून भुजबळांचा जरांगेंना सवाल

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला २४ तारखेचा अल्टिमेटम दिला. मात्र, ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला. कुणबी दाखल्याच्या मुद्दावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एकमेकांवर टीका केली. दरम्यान, आज पुन्हा एकदा भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र डागलं. राजकीय नेत्यांना गावबंदी केली, महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे का, असा खरमरीत सवाल भुजबळांनी केला.

कंगनाने केले कोहलीचे तोंडभरून कौतुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘विराटची पावलं जिथे पडली…’ 

जालन्याच्या अंबड येथे ओबीसी नेत्यांची एल्गार सभा झाली. या सभेला संबोधित करतांना भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. ते म्हणाले, आता मराठा समाजाचा नवा नेता तयार झाला आहे. धनगर, तेली, माळी यांचा नंतर ओबीसीमध्ये समावेश करण्यात आल्याचे ते सांगत आहेत. पण आरक्षण म्हणजे काय ते समजून घ्या. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. 75 वर्षे झाली, संविधानाने दलित समाजाला आरक्षण दिले, अनेक कलेक्टर झाले, आयपीएस झाले पण गरिबी हटली नाही. ओबीसींची गरिबी दूर झालेली नाही. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे वर्षानुवर्षे अत्याचार करणाऱ्यांना पुढे करण्यासाठी आहे, हे समजून घ्या. मला मराठा तरुणांना सांगायचं आहे, याच्या कुठं मागं लागला. झाडाला शेंदूर फासून देव झाला, त्याला कळणां आणि वळणा, अशी टीका भुजबळांनी केली.

शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेंची साथ सोडणार, अजित पवार गटात करणार प्रवेश? 

आरक्षणाच्या मद्दावरून राजकीय नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आली. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय काय? मी सांगितलं करेंगे या मरेंगे, तर तुमचा पाव्हणा म्हणतो, बघा हा हिंसाचार आहे. करेंगे या मरेंगे हे महात्मा गांधीचं वाक्य आहे. आणि हे म्हणतात की, लढेंगे आणि जितेंगे, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ यांनी कार्तिकी एकादशीच्या मुद्दावरूनही टीका केली. ते म्हणाले, आता गाव झालं, आता देवही यांच्या सातबाऱ्यावर झाले. अजित पवारांना म्हणाले, पंढरपुरात यायचे नाही. पंढरपुरच्या देवालाही जात लागली का? आरक्षण देत नाही, म्हणून पंढरपुरात जायचं नाही का? मला पोलिसांना सांगायचे आहे की गावातील गावबंदीचे फलट हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचं राज्य आहे. आमदार आणि नेत्यांना गावात घ्यायचं नाही, दोन चार पोट्टी बोर्ड लावतात, हे आता चालणार नाही, असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा मोर्चे निघाले, अठ्ठावन मोर्चे निघाले. तेव्हा आम्ही विरोध केला नाही. फडणवीसांनी आरक्षण दिलं, तेव्हाही आम्ही विरोध केला नाही. कारण, त्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नव्हता, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube