शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेंची साथ सोडणार, अजित पवार गटात करणार प्रवेश?

  • Written By: Published:
शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेंची साथ सोडणार, अजित पवार गटात करणार प्रवेश?

पुणे : आगामी 2024 च्या लोकसभा (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हालचाली सुरू झाल्यात. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यातही नव्याने उदयास आलेल्या युती आणि आघाड्यांमुळे अनेक मतदारसंघाचे राजकीय गणित बदलले आहेत. त्यामुळे राजकीय सोय म्हणून अनेक नेतेमंडळी पक्षांतराच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाकडून नऊ लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय सोय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करतील आणि शिरूर लोकसभा लढवतील, असं बोललं जात आहे.

‘लेकरांचं नाव घेऊन लहान भावाच्या ताटातलं काढाल तर..’; वडेट्टीवारांचा जरांगेंना थेट इशारा

दुसरीकडे शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच आगामी लोकसभेचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे बोलले जात आहे. तर अजित पवार गटाने देखील या जागेवर दावा ठोकल्याने शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट, असा सामना देखील पहायला मिळू शकतो. मात्र, या ठिकाणी भाजपकडून देखील मोर्चेबांधणी केली जात आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव देखील अधून-मधून चर्चेत येत आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेचा पेच महायुतीसमोर आहे. मात्र, आढळराव पाटलांच्या अजित पवार गट प्रवेशाच्या चर्चेने मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.


OBC Reservation : ..तर महाराष्ट्र पेटून उठेल; ‘ओबीसी’ एल्गार सभेत पडळकरांचा इशारा

आढळराव परदेशात
याबाबत आढळराव पाटलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार आढळराव पाटील हे पुढील पाच ते सहा दिवस देशाबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान,आढळराव पाटलांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून याआधी शिवसेनेकडून तीन वेळा विजय मिळवला होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवसेनेचा मित्र पक्ष असल्याने विजयी उमेदवारालाच या ठिकाणी उमेदवारी मिळेल हे ओळखून आढळवांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, अजित पवार हे देखील महायुतीत आल्याने त्यांची मात्र गोची झाली आहे. अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर सांगितलेल्या दाव्यामुळे राजकीय तडजोड म्हणून आढळराव अजित पवार गटात प्रवेश करतील,असं बोललं जात आहे. मात्र, यावर अद्याप कुठलीही आढळराव पाटलांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज