OBC Reservation : ..तर महाराष्ट्र पेटून उठेल; ‘ओबीसी’ एल्गार सभेत पडळकरांचा इशारा
OBC Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभेला सुरुवात झाली आहे. या सभेसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, महादेव जानकर आदी उपस्थित आहेत. या सभेत बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. पडळकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे. त्यासाठी कुणाचाच विरोध नाही. पण, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. ओबीसीत अनेक जाती आहेत. अनेक जातींना अजूनही आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. पण जर ओबीसींवर अन्याय करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
भुजबळांचा विरोध वैफल्यातून, ‘कुणबी’ नोंद सापडल्यास OBC पासून कोणीही थांबवू शकत नाही
भुजबळ साहेब घाबरू नका, धनगर समाज तुमच्या पाठिशी
छगन भुजबळांचे मला विशेष अभिनंदन करायचे आहे. छगन भुजबळांचे मला विशेष अभिनंदन करायचे आहे. यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. मी त्यांचं अभिनंदन करतोय की राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त, जमाती यांच्यात उर्जा निर्माण करण्याचं काम केलं. सिंह म्हातारा झाला तर तो गवत नाही. वाघ म्हातारा झाला म्हणून तो डरकाळी फोडायचं राहत नाही. आमची लोकं अजूनही वंचित आहेत. भुजबळ साहेब घाबरायचं काही कारण नाही. या देशातला पाच कोटी धनगर समाज तुमच्या पाठिशी आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू कोण?
मराठा आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही असे स्पष्ट करत मराठा आरक्षणाचा खरा शत्रू कोण? विरोधक नेमका कोण असा सवाल पडळकर यांनी उपस्थितांना केला. आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही. ओबीसींचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. प्रस्थापितांनी गरीब मराठ्यांवर अन्याय केला. स्वतःच्या मुलांना लोकांना कारखाने दिले आणि गरीब मराठ्यांच्या हातात कोयता दिला. त्यामुळे तुमचा खरा शत्रू ओळखा,असे आवाहन पडळकर यांनी केला.
ओबीसींनी आता एकजूट होण्याची गरज आहे. प्रस्थापितांविरोधात संघर्ष करा. भुजबळ साहेबांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. गावागावात ही भूमिका पोहोच करण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे, असेही पडळकर म्हणाले.
पंकजा मुंडेंच्या गैरहजरीची चर्चा
या सभेला भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा सभास्थळी रंगली होती. पंकजा मुंडे का उपस्थित राहिल्या नाहीत त्याचं कारण काय याची चर्चा सुरू होती. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात मोठी यात्रा काढली होती. त्यानंतर दसरा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात लाखो लोकांची उपस्थिती होती. त्यामुळे पंकजा मुंडे ओबीसी आरक्षण एल्गार सभेलाही उपस्थित राहतील असे सांगितले जात होते. परंतु, त्या या सभेला उपस्थित राहिल्या नाहीत.