Maratha Reservation : ‘मराठ्यांना सल्ले देऊ नका’; ‘OBC मधून आरक्षण शक्य नाही’ म्हणणाऱ्यांना जरांगेंनी सुनावलं

Maratha Reservation : ‘मराठ्यांना सल्ले देऊ नका’; ‘OBC मधून आरक्षण शक्य नाही’ म्हणणाऱ्यांना जरांगेंनी सुनावलं

Manoj Jarange On Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी, त्यांनी मराठ्यांना सल्ले देऊ नये, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुनावलं आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलेलं असतानाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं होतं. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत वडेट्टीवारांना चांगलच सुनावलं आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधून बोलत होते.

Mahua Moitra : महुआ मोईत्रांचे ग्रह फिरले! ‘त्या’ अहवालाच्या विरोधात फक्त 4 खासदार

मनोज जरांगे म्हणाले, अभ्यास करा हे आम्हाला सांगायची गरज नाही, अभ्यास करुन बरगड्या मोडल्या आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करु नका, आम्ही हिरो नाही झालो. विजय वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी असून वडेट्टीवारांनी मराठ्यांना सल्ले देऊ नये, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

href=”https://letsupp.com/politics/dcm-devendra-fadnvis-speak-on-maratha-obc-reservation-103241.html”>Maratha Reservation : ‘जातीय सलोखा राखणं ही समाजाची अन् नेत्यांची जबाबदारी’; फडणवीसांचं विधान

तसेच हिरो शब्द वापरुन वडेट्टीवारांनी संभ्रम निर्माण करु नये, त्यांना जनतेला न्याय देण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे दिले आहे. सध्या त्यांना गोरगरिब आठवत नाहीत वाटतं. कोण कोणासाठी आणि कोण राजकारणासाठी करतं आहे हे मराठ्यांना माहित झालं आहे. आम्हाला तुमचे सल्ले द्यायची गरज नाही. मराठ्यांनी तुम्हाला पूर्ण ओळखले असल्याचं म्हणत एक प्रकारे जरांगे पाटलांनी वडेट्टीवारांना इशाराच दिला आहे.

Uddhav Thackeray : ‘देशाची अखंडता धोक्यात राज्यकर्ते मात्र निवडणूक प्रचारात’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

काय म्हणाले होते वडेट्टीवार?
आरक्षण द्यायचं असेल तर कोणत्याही समाजाला आरक्षणासाठी प्रक्रियेतून जावं लागतं. कोणत्याही समाजाला आपलं शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणा सिद्ध करावाच लागतो. या प्रक्रियेसाठी राज्य ओबीसी आयोग, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करावं लागत असल्याचंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. सरकारच्या चार पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नसल्याचंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षणावरुन मराठा बांधवांकडून सरकारची कोंडी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी सरकारमधील ओबीसी नेते छगन भुजबळ मराठा आरक्षणाला प्रखरपणे विऱोध करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन वादंग सुरु असतानाच आता विजय वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे. त्यावरुन मनोज जरांगे यांनी सडेतोडपणे प्रत्युत्तरही दिलं. जरांगेंच्या भूमिकेवर आता वडेट्टीवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube