OBC Reservation : महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा; बबनराव तायवाडेंची मागणी

OBC Reservation : महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा; बबनराव तायवाडेंची मागणी

OBC Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभेला सुरुवात झाली आहे. या सभेसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भादप आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित आहेत. या सभेत बोलताना ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी महाराष्ट्रातही बिहार प्रमाणे जातनिहाय जनगणना करावी. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र ही मागणी अचानक आली आहे. त्यामुळे त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी केली.

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना धमक्यांचे फोन; काय आहे प्रकरण?

मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू कोण?

मराठा आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही असे स्पष्ट करत मराठा आरक्षणाचा खरा शत्रू कोण? विरोधक नेमका कोण असा सवाल पडळकर यांनी उपस्थितांना केला. आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही. ओबीसींचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. प्रस्थापितांनी गरीब मराठ्यांवर अन्याय केला. स्वतःच्या मुलांना लोकांना कारखाने दिले आणि गरीब मराठ्यांच्या हातात कोयता दिला. त्यामुळे तुमचा खरा शत्रू ओळखा,असे आवाहन पडळकर यांनी केले.

पंकजा मुंडेंच्या गैरहजरीची चर्चा 

या सभेला भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा सभास्थळी रंगली होती. पंकजा मुंडे का उपस्थित राहिल्या नाहीत त्याचं कारण काय याची चर्चा सुरू होती. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात मोठी यात्रा काढली होती. त्यानंतर दसरा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात लाखो लोकांची  उपस्थिती होती. त्यामुळे पंकजा मुंडे ओबीसी आरक्षण एल्गार सभेलाही उपस्थित राहतील असे सांगितले जात होते. परंतु, त्या या सभेला उपस्थित राहिल्या नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube