Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? पृथ्वीराज चव्हाणांनी घेतलं PM मोदींचं नाव

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? पृथ्वीराज चव्हाणांनी घेतलं PM मोदींचं नाव

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नात (Maratha Reservation) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही या प्रश्नात सर्वपक्षीय नेत्यांनी पीएम मोदींना भेटले पाहिजे असे मत व्यक्त केले. दिवाळी सणानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण व्यावहारिकदृष्ट्या योग्य होते. पण, पुढे फडणवीस सरकारला ते टिकवता आले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे. त्यांच्यासमोर योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Maratha Reservation : ..तर मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर, अशोक चव्हाणांनी सांगितला तोडगा

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. तेव्हा तुम्ही निवडणुकीत उतरणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर चव्हाण म्हणाले, अजून आमच्या आघाडीत कोण किती जागा लढणार याबाबत काहीही निश्चित नाही. ते आधी ठरलं पाहिजे. महाविकास आघाडीत जो निर्णय होईल त्यावर पुढील दिशा ठरेल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबाबत मांडलेली भूमिक वैयक्तिक आहे. काँग्रेस पक्षाची तशी भूमिका नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राम मंदिराचा भाजपला फायदा होणार नाही 

राम मंदिराचं बांधकाम आता पूर्ण झालं आहे. तरीदेखील आगामी निवडणुकीत या मुद्द्याचा भाजपला फायदा होईल असे मोदींनाच वाटत नाही. त्यामुळेच तर भाजप वेगवेगळ्या मार्गांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभरात आता भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

.. तर मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर – अशोक चव्हाण 

बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. जे बिहारमध्ये शक्य आहे, ते महाराष्ट्रात का नाही? राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत; जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल, असे अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

मुर्खों के सरदार! काँग्रेस अन् राहुल गांधींवर PM मोदींची प्रखर शब्दात थेट टीका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज