रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू, आरोप सिध्द करा अन्यथा…; मंत्री विखेंचा इशारा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar : राज्यात राबण्यात आलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti) प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेकदा केली. त्यांनी वारंवार या भरतीसंदर्भात संशय व्यक्त करत थेट आरोप केले होते. त्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे विखे म्हणाले आहेत. आज अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
‘मी’ म्हणजे मराठा समाज, हे डोक्यातून काढा; मंत्री विखेंनी जरांगेंना सुनावलं
यावेळी बोलताना विखे म्हणाले, तुम्ही कोणतेही ठोस पुराने न देता बेताल वक्तव्ये करता, आता जाहीरपणे त्याचे पुरावे लोकांसमोर मांडा.. तुम्ही कुणाचे नातेवाईक आहात म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवाने परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पुरावे द्या नाहीतर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
मोठी बातमी! लोकसभेसाठी भाजपचे शिलेदार ठरले? पहिली यादी तयार
पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांचा समाजात आदर होता. मात्र, मी म्हणजे मराठा समाज हे जरांगेंनी मनातून काढून टाकावं. तसंच त्यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळणं थांबवावं. फडणवीस यांच्याविरोधातील वक्तव्य हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही. सरकारने आरक्षण देण्याचे मान्य केले आहे, जीआर काढले आहेत. मात्र, ते तुम्हाला मान्य नाही. त्यामुळे तुम्ही म्हणजे समाज नाही. समाजाने आंदोलनाला पाठिंबा दिला, पण तुम्हाला स्वत:चं हित साध्या करायचं आहे, अशी टीकाही विखेंनी केली.
शरद पवारांनी मला राजकारणात येऊ दिले नाही, म्हणून अजित पवारांचा मार्ग सुकर झाला, असं वक्तव्य राजेंद्र पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चा रंगली आहे. यावरही विखेंनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मी त्यांचं विधान ऐकले नाही. मात्र, रोहित पवारांना तो सूचक इशारा असला पाहिजे की, फार धावपळ करून को, जशी अजित दादांची फसवणूक झाली, तशी तुझी देखील फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. हेच त्यांना त्यांच्या वक्तव्यातून सूचित करायचं आहे, असं विखे म्हणाले.