कारखाने, झाकीर नाईक अन् तलाठी भरती घोटाळा; विखेंच्या बालेकिल्ल्यात राऊतांनी सगळंच काढलं

कारखाने, झाकीर नाईक अन् तलाठी भरती घोटाळा; विखेंच्या बालेकिल्ल्यात राऊतांनी सगळंच काढलं

Sanjay Raut On Radhakrusha Vikhe : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभर जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांची घराणेशाही, साखर कारखाने, तलाठी भरती, झाकीर नाईककडून आलेल्या पैशांसंदर्भात थेट भाष्य करीत सगळंच बाहेर काढलं आहे.

कियारा नाही तर ‘ही’ अभिनेत्री होणार ‘भूल भुलैया 3’ची मंजुलिका; कार्तिकने थेट रिलीज डेट केली जाहीर

संजय राऊत म्हणाले, घराणेशाहीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहीत आहे नसेल तर आम्ही त्यांना सांगतो राधाकृष्ण विखे मंत्री आहेत, त्यांचा मुलगा सुजय विखे खासदार, जिल्हा परिषदेत बहुमत असेल तर पत्नीला अध्यक्षपद,.मुलगी सुश्मिताच्या नावावर गंगापूर कारखाना, दुसऱ्या मुलीसाठी राहुरी कारखाना, सन्माननीय मेहुणे राजेश परझणे यांना महानंदाचं अध्यक्षपद दिलं, भाऊ मेडिकल कॉलेज पाहतात. केंद्राने मेडिकल कॉलेज मंजूर करुनही सरकारी मेडिकल कॉलेजसाठी आपल्याला जागा मिळू देत नाहीत नाहीतर यांचा धंदा बंद होईल, म्हणूनच मिळू देत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र? भाजपाच्या सर्व्हेने विरोधकांना धडकी

तसेच राज्यात महसूलमंत्र्यांच्या अखत्यारित असलेला तलाठी भरती घोटाळा हा देशातला सर्वांत भयंकर घोटाळा असून त्याची ईडी चौकशी झाली पाहिजे, या भरतीत घराणेशाहीने प्रत्येक उमेदवाराकडून 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. महाराष्ट्रातून हजारो तरुणांचं आयुष्य त्यांनी रस्त्यावर आणलं आहे. प्रवरा साखर कारखान्यात 191 कोटींचा घोटाळा केला असून कारखान्याला 895 कोटी कर्ज आणि इतर देणी असतानाही तीन वर्षांच्या ऑडिटमध्ये खोटी आकडेमोड करुन कारखान्याला फायदा असल्याचं या लोकांनी दाखवलं असल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

डॉ. झाकीर नाईकांकडून विखे ट्रस्टला 5 कोटी रुपये…
कुठे ईडी, सीबीआय, गृहमंत्री फडणवीस ऐकतायं ना. तुम्ही विरोधकांच्या मागे लागता. लहान ृ-लहान खटले बाहेर काढता, गणेश साखर कारखान्यात 112 कोटी रुपयांचा विखेंनी काळा बाजार केलायं. दहशतवादाला अर्थपूरवठा करणारा डॉ. झाकीर नाईक त्याचे दाऊदशी, पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध आहेत, त्या त्या झाकीर नाईककडून विखे पाटील ट्रस्टला 5 कोटी रुपये मिळालेले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

नाईकांबद्दल आरोप झाल्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांचं स्पष्टीकरण हाच मोठा पुरावा आहे. विखे म्हणाले होते, मला पाच नाहीतर अडीच कोटीचं मिळाले आहेत. दहशतवादी मार्गाने मिळालेला पैसा विखे ट्रस्टमध्ये आला असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube