Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र? भाजपाच्या सर्व्हेने विरोधकांना धडकी

Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र? भाजपाच्या सर्व्हेने विरोधकांना धडकी

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाविकास (Lok Sabha Election 2024) आघाडीला जोरदार धक्के बसले. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या फाटाफुटीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष खिळखिळे झाले आहेत. या परिस्थितीतच त्यांना राजकारणाची गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत. दुसरीकडे महायुतीच्या बाजूने वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने भाजपाने (BJP) आणखी एक डाव खेळण्याची तयारी केली आहे. राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेता येतील का? याची चाचपणी सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक (Elections 2024) घेणे कितपत फायदेशीर ठरू शकेल यासाठी गुप्त पद्धतीने सर्वेक्षण सुरू आहे. दोन्ही निवडणुका जर एकत्रित घेतल्या तर काय फायदा होऊ शकतो, त्याचा काही प्रतिकूल परिणाम होईल का याची चाचपणी केली जात आहे. या सर्वेक्षणानंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्यांकडून याबाबतचा सर्व्हे सुरू आहे.

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीला धक्का; लोकसभेसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा

महाविकास आघाडीची कोंडी वाढणार 

लोकसभा निवडणुकीत किमान 40 जागा जिंकायच्या असे उद्दीष्ट महायुतीने निश्चित केले आहे. अशोक चव्हाणांसह आणखी काही नेते भाजपसोबत गेल्यास त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर निवडणुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे हा खर्च करणे महाविकास आघाडीला कठीण होईल. परंतु, जर निर्णय झाला तर दुसरा पर्याय महाविकास आघाडीसमोर नाही.

..तर भाजपालाही फटका बसू शकतो

पंतप्रधान मोदी यांचा (PM Narendra Modi) करिश्मा अजूनही कायम आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही त्याचा फायदा करून घ्यायचा असा भाजपाचा प्लॅन आहे. मात्र, लोकांनी विधानसभा डोक्यात ठेऊन मतदान केले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे आधी मोदींच्या नावावर लोकसभा लढवायच्या आणि नंतर विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या असाही एक मतप्रवाह भाजपात आहे. यानंतर आता काय निर्णय घेतला जातो याचे उत्तर सर्वे पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे. या सर्वेतून काय निष्कर्ष समोर येतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Ashok Chavan : ठरलं तर! अशोक चव्हाणांसह आणखी एका आमदाराचा भाजपप्रवेश; आजचाच मुहूर्त

follow us
  • fb
  • instagram
  • youtube