Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीला धक्का; लोकसभेसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा

  • Written By: Published:
Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीला धक्का; लोकसभेसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा

Loksabha Election 2024 :लखनऊः बसपाच्या (BSP) च्या अध्यक्षा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मायावती यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीबाबत Loksabha Election 2024मोठी घोषणा केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए किंवा इंडिया आघाडीत सहभागी होणार नाही. आम्ही स्वतंत्र्यपणे लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे मायावती यांनी घोषित केले. बसपाची उत्तर प्रदेशबरोबर इतर काही राज्यात व्होट बँक आहे. त्यामुळे एका अर्थाने इंडिया आघाडीसाठी हा एक धक्काच मानला जात आहे.

लोकसभा झाल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका…कर्डिले असं का म्हणाले?

मायावती यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधत अखिलेश यांच्या सरड्याशी तुलना केली आहे. तर राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले आहे. मायावती म्हणाल्या, जातीवाद, भांडवलदारांचे विचार असलेल्या पक्षापासून आम्ही दूर राहणार आहोत. येत्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष गरिबी, दलित, आदिवासी, मुस्लिम आणि इतर अन्य धर्माच्या अल्पसंख्याक समाजाच्या जोरावर तयारी करत आहोत. या सर्वांच्या जोरावर आम्ही स्वतंत्र्यपणे मैदानात उतरणार आहे. २००७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये आम्ही एकटे लढून बहुमत मिळविले होते.

काही जण मुलांनाही सोबत नेत आहेत, हा दौरा की सहल? आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर CM शिंदेंचा दावोस दौरा

मायावती यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत इव्हीएममध्ये गडबड न केल्यास आमच्या पक्षाला चांगल्या जागा मिळतील. बसपाचे नेतृत्व दलित व्यक्तीच्या हातात. परंतु अनेक पक्षांची जातीयवादी मानसिकता अजून बदलेली नाही. त्यामुळे आघाडी करून निवडणूक लढल्यास आघाड्यांतील पक्षांना मते मिळतात. परंतु उच्च वर्गातील जातींचे मते ही बसपाला मिळत नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र्यपणे निवडणुकीत उतरणार असल्याची खंतही मायावती यांनी बोलून दाखविली आहे.

मोफत राशनवरून मोदींवर निशाणा

मोदी सरकारकडून मोफत राशन दिले जात आहे. हे गुलामीत ठेवण्याचा प्रकार आहे. यूपीत आमची सत्ता असताना सर्व वर्गाला आम्ही काम दिले होते. अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी आणि इतर वर्गासाठी जनकल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या. परंतु आताचे सरकार रोजगाराचे साधन देण्याएेजी मोफत थोडे धान्य देऊन गरीब जनतेला आपले गुलाम बनवत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube