Loksabha Election 2024 : संजय निरुपम, मिलिंद देवरांनी उद्धव ठाकरेंना कोंडीत का पकडले ?

  • Written By: Published:
Loksabha Election 2024 : संजय निरुपम, मिलिंद देवरांनी उद्धव ठाकरेंना कोंडीत का पकडले ?

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-:लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजू लागले आहेत. त्यात एका संस्थेची मतदार कल चाचणी महाविकास आघाडीच्या बाजूने आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी आनंदी आनंद आहे. या मतदार कल चाचणीचा आधार आता महाविकास आघाडीचे नेते घेत आहे. त्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून थेट तू-तू मैं-मैं होऊ लागले आहेत. मुंबईतील जागेवर आता महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) (ठाकरे गट) आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यांमध्ये उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. ते एकमेंकाना थेट आव्हान देऊ लागले आहेत. मुंबईत जसा शिवसेनाचा ( ठाकरे गट) जनाधार आहेत. तसेच काँग्रेसला जनाधार आहे. काँग्रेसला मानणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचा मतदार येथे आहे. काँग्रेसकडे काही ताकदीचे नेते आहेत. ते खासदार राहिलेले आहे. मुंबईतील महत्त्वाच्या जागा ठाकरे गटाला गेल्यावर काँग्रेस नेत्यांचे काय होणार आहे हा प्रश्न असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे काही संघर्ष करून उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्याची रणनिती काँग्रेसकडून आखली गेली असल्याचे बोलले जात आहे.

पाणबुडी प्रकल्प गुजरातला? नितेश राणेंनी सगळा इतिहासच सांगितला

दबाव टाकण्यात प्रामुख्याने माजी खासदार संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीत मुंबईत जागावाटप करायचे झाल्यास मिलिंद देवरा यांचा दक्षिण मुंबई आणि संजय निरुपम यांना हवा असलेला उत्तर-पश्चिम मुंबई हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. दक्षिण मुंबईत सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार आहेत. तर उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तीकर खासदार होते. जे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेना दावा करणार हे नक्की आहे.

नवरा-बायकोत रस्सीखेच, तिसऱ्यानेच मारली बाजी : सर्वोच्च प्रशासकीयपदी ‘डॉ. नितीन करीर’ विराजमान

संजय निरुपम हे एकेकाळी राज्यसभेवर शिवसेनेकडून गेले होते. नंतर 2009 मध्ये ते उत्तर-मुंबईत लोकसभेवर काँग्रेसकडून निवडून गेले. या ठिकाणी दोन वेळा काँग्रेसचा पराभव झाला आहे. निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ काहीसा ‘सेफ’ आहे; तर देवरा यांना दक्षिण मुंबई हा एकमेव मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ देखील शिवसेनेकडे गेल्यास देवरा यांची वाट अधिक बिकट होणार आहे.

तिकडे दक्षिण-मध्य मतदारसंघातही शिवसेना-काँग्रेस अशीच लढत राहिली आहे. त्यामुळे आता जागावाटप करताना तीन मतदारसंघात रस्सीखेच राहणार आहे. दक्षिण-मध्य मतदारसंघात वर्षा गायकवाड या खासदारपदासाठी इच्छुक नाहीत. पण त्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहेत. त्यामुळे जागा वाटपात अधिकाधिक जागा काँग्रेसला मिळवून घेण्यास प्रयत्नशील आहेत.

लोकसभेसाठी जागावाटप कसे होते ? त्यावर वर्षभरात होणाऱ्या विधानसभेत महाआघाडी एकत्रित सत्तेत गेली अथवा मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेस आणि शिवसेना जागावाटप किचकट असणार आहे. आपल्या जागा सुरक्षित करण्यासाठी काँग्रेस नेते अधिकाधिक प्रयत्नशील आहेत. यातूनच शिवसेनाची मुंबईत कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज