पाणबुडी प्रकल्प गुजरातला? नितेश राणेंनी सगळा इतिहासच सांगितला

पाणबुडी प्रकल्प गुजरातला? नितेश राणेंनी सगळा इतिहासच सांगितला

Nitesh Rane : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात नसून गुजरात, केरळमध्येही असा प्रकल्प केला जात असल्याचं दावा भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवून नेत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. या कलगीतुऱ्यानंतर आता नितेश राणे यांनी पाणबुडी प्रकल्पाचा सगळा इतिहास सांगत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणे म्हणाले, कोकणात सिंधुदुर्गात होणारा पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला जात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच हा प्रकल्प होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलट-सुलट बातम्या येत आहेत. कोणतीही खात्रीशीर माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी,आमच्या महायुती सरकारवर टीका करण्याचे काम करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसेच हा पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हयातच होणार आणि आदर्श प्रकल्प म्हणून नावारूपास येईल, असं आमदार नितेश राणे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे.

राज ठाकरेंच्या भेटीमागे CM शिंदेंचा पॉवर गेम; ‘इलेक्शन पॉलिटिक्स’ ‘उबाठा’ला देणार टेन्शन!

आदित्य ठाकरेंवरच फोडलं खापर :
२०१८ च्या जवळपास मंत्री दीपक केसरकर हे अर्थ राज्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोणतीही चालना येथील पर्यटनाला दिली नाही. प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला. त्यामुळे या प्रकल्पाचे येथील काम जैसे थेच राहिले. हे सगळं आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळेच झालं असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

Year Ender 2023 : कोरोनानंतर बॉलिवूडला उंचीवर नेणारं वर्ष 2023; ‘या’ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ

पाणबुडी प्रकल्प महायुतीचं सरकार हा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल, जसा पाणबुडीच्या प्रकल्प सिंधुदुर्गात आला, तसाच प्रकल्प गुजरातने करायचा निर्णय घेतला आहे. केरळमध्येही देखील असा प्रकल्प सुरू होणार आहे, कोणीही आपला प्रकल्प पळवला असे म्हणता येणार नसल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात होणार होता. मात्र, येथील प्रकल्प बंद पडला असून गुजरातला प्रकटणार आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील या प्रकल्पासाठी 56 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. इतकेच नाही तर काही निधीही देण्यात आला होता. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र सरकारमध्ये वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि पर्यटन खात्याच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बातम्या यांमुळे हा प्रकल्प रखडला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज