‘दर वेळेला नितू बाळाला तोंडघशी पाडायचं याचा अर्थ काय?’, अंधारेंचा नितेश राणेंना टोला
Sushma Andhare : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी खास ख्रिसमस सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान कार्यालयाने अनेक कलाकार, नेते, अधिकारी आणि मान्यवरांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया हा देखील उपस्थित होता. डिनोने यावेळी पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
‘नक्कल करुन स्वत:ची कुवत दाखवतात’; दादांच्या मिमिक्रीवर तटकरेंनी सुनावलं
डिनोने पीएम नरेंद्र मोदींसोबत संवाद साधतांनाचे फोटो शेअर केले. या फोटोसह त्यांनी एक पोस्टही लिहिली. ज्यामध्ये त्याने ख्रिसमस लंच सर्वात खास असल्याचं सांगितलं आहे. आता डिनोने शेअर केलेल्या फोटोंवरून सुषमा अंधारे यांनी एका नितेश राणेंना चिमटा काढला आहे. कारण नितेश राणेंनी अनेकदा डिनो मोरियावर टीका केली. डिनो मोरिया हा मुंबई महापालिकेचा सचिन वाझं आहे, असंही राणे म्हटलं होते.
‘दादांचं बंड स्वार्थासाठी’ म्हणणाऱ्या शालिनीताईंना चपराक; चाकणकर म्हणाल्या, ‘नैराश्यपोटीच..,’
दरम्यान, हाच धागा पकडून सुषमा अंधारे यांनी एक ट्वीट केलं. त्यात धारेंनी लिहिलं की, मला हे अजिबात आवडलेलं नाही. दरवेळी आमच्या नितू बाळाला असं तोंडघशी पाडायचं… याचा अर्थ काय? याच डिनो मोरियावरून नितू आणि समस्त भाजपच्या बार्किंग ब्रिगेडने किती उर बडवून घेतला होता, अशी पोस्ट करत अंधारेंनी नकली हिंदू असा हॅशटॅगही वापरला आहे.
काय होता डिनो मोरिया-नितेश राणे वाद?
‘राज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारा डिनो मोरिया आता रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण गुजरातचे व्यापारी संदेसरा बंधूंनी केलेल्या 14,500 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात मोरियाची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली. यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. दरम्यान, नितेश राणे यांनी मोरियाचे नाव घेऊन शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. मुंबई महापालिकेशी संबंधित कोणतेही काम क्षणात पूर्ण करू शकतो, असे मोरिया लोकांना सांगत असतात, असा आरोप राणेंनी केला. मोरिया यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईनंतर नितेश राणे चांगलेच सक्रीय झाल. सखोल चौकशी झाल्यास अनेक ‘पेंग्विन’ समोर येतील, असा इशाराही नितीश राणेंनी आदित्य ठाकरेंना दिला होता.