एसआयआर सुधारणा नाही, गुन्हा; 16 बीएलओंच्या मृत्यूचे दाखले देत राहुल गाधींचा भाजप अन् आयोगावर निशाणा

Rahul Gandhi यांनी एसआयआरमधून सुधारणा नाही केवळ दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत भाजप अन् आयोगावर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi

SIR is not a amendment is a crime; Rahul Gandhi targets BJP and Election Commission for death of 16 BLOs  : काँग्रेसने भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन म्हणजेच एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचा उद्देश मतदार यादी अपडेट करणे आणि पात्र मतदारांचा समावेश करणे, तसेच नावांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करणे असा आहे. मात्र यामधून कोणतीही सुधारणा नाही तर केवळ दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवर टीका करताना राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एसआयआरच्या नावाखाली देशभर घोळ सुरू आहेत. ज्याचा परिणाम हा गेल्या तीन आठवड्यांमध्ये तब्बल 16 बीएलओंचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये हार्ट अटॅक, तणाव आत्महत्या ही कारणं आहेत. त्यामुळे एसआयआर ही सुधारणा नसून एक मोठा गुन्हा आहे.

‘या’ 4 राशींच्या आयुष्यात होणार भरभराट तर तुमच्या राशीचं काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य…

केंद्रीय निवडणूक आयोगाने एक अशी सिस्टीम बनवली आहे. ज्यामध्ये नागरिकांना स्वतःची मतदार म्हणून ओळख सापडण्यासाठी तब्बल 22 वर्षं च्या जुनी मतदार याद्या, हजारो स्कॅनचे कागद चाळावे लागणार आहेत. ज्याद्वारे आयोग आणि भाजपचा एकच हेतू आहे की, खरा मतदार या प्रक्रियेमध्ये थकून जाईल, हार मानेल आणि मतचोरी चालू राहील.

https://x.com/RahulGandhi/status/1992544334206693848?

एकीकडे भारत जगासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर बनवतं, पण भारताचा निवडणूक आयोग मात्र आजही कागदांचे जंगल निर्माण करायला बसला आहे. जर त्यांची नियत साफ असली असती तर या मतदार याद्या डिजिटल. सर्चेबल आणि मशीन रिडेबल बनवण्यात आल्या असत्या. निवडणूक आयोगाने गेल्या 30 दिवसांपासून सुरू असलेल्या अंदाधुंद कामाऐवजी योग्य वेळ मागून घेऊन पारदर्शक आणि योग्य काम कारण्यावर भर दिला असता.

Video : मी जर तिसरा डोळा उघडला तर.., उज्वला थिटेंनी राजन पाटलांचा इतिहासच सांगितला

मात्र एसआय आर एक ठरवून केलेले षडयंत्र आहे. ज्यामध्ये नागरिकांना त्रास दिला जात आहे आणि बीएलओंचा अनावश्यक तणावामुळे मृत्यू होत आहे. याला कॉलेक्टर डॅमेज म्हणून दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक आयोगाची केवळ नाकामी नाही तर षडयंत्र आहे. यातून सत्तेच्या रक्षणासाठी लोकशाहीचा बळी दिला जातोय असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

follow us