Video : मी जर तिसरा डोळा उघडला तर.., उज्वला थिटेंनी राजन पाटलांचा इतिहासच सांगितला
आमचं सगळच राजन पाटील यांनी हिसकाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हा माय लेकराला आता मरायचीही भीती नाही असं उज्वला म्हणाल्या आहेत.
मी मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगते, आजपर्यंत राजन पाटलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर मी कुठलेच आरोप केलेले नाहीत. मला त्यांनी बोलायला लाऊ नये. (Election) कुणीतरी मर्जीत असलेल्या महिला गोळा करायच्या, काही माध्यमांची माणसं जवळ करून माझ्यावर घाण आरोप करणं सुरू आहे. परंतु, मी जर तोंड उघडं तर राज्यभरात बाई माणसांसारख तोंडाला स्कार्प बांधून फिरावं लागेल असा थेट घणाघात उज्वला थिटे यांनी केला आहे. त्या लेट्सअप मराठीवर संपादक योगेश कुटे यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी उज्वला यांनी राजन पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
आमचं सगळच राजन पाटील यांनी हिसकाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हा माय लेकराला आता मरायचीही भीती नाही. जे काही व्हायचं ते होईल. रोजचा संघर्ष वाट्याल आला आहे. मी कमरेला कोयता घेतलाय आणि मुलाच्या हातात नांगर दिलाय असं म्हणत उज्वला थिटे यांनी ही लढाई काही आता थांबणार नाही असंच यावेळी सुचित केलं आहे. त्याचबरोबर, आम्ही लढतोत हे पाहून आता इतरांमध्ये तरी बळ येईल असंही त्या म्हणाल्या आहेत. राजन पाटलांचा इतका धाक होता आणि आजही आहे की, त्यांचं नाव घेण्याची कुणाची हिंमत नव्हती असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
मला निवडणुकीचा फॉर्म भरू द्यायचा नाही याची तयारी पहिलीच सुरू झाली होती. याविषयी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ते म्हणायचे आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. परंतु, इथले स्थानिक पोलीस म्हणायचे आम्हाला परवानगी नाही, त्यामुळे मला अशा पद्धतीने पुढच येऊ द्यायचं नाही याचे प्रयत्न त्यांनी केले. याविषयी कुणी वकीलही तक्रार घेणार नाही अशीही त्यावेळी परिस्थिती निर्माण केली होती, असा धक्कादायक खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, मुलाने सुचक म्हणून सही केल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. परंतु, राजन पाटील असले कितीही कागदं बदलू शकतात असा थेट आरोप उज्वला थिटे यांनी यावेळी केला.
माझ्या पाठीशी कुणीच नाही गावातलं. माझं 90 टक्के गाव राजन पाटलाने हातात घेतलय. राजन पाटलाच्या विरोधात जावं अशी गावात कुठच परिस्थिती ठेवली नाही असंही उज्वला थिटे यावेळी म्हणाल्या आहेत. माझ्या कुटुंबातीलही लोक त्यांच्याच बाजूने आहेत. आजपर्यंत अनगरमध्ये पोलीस चौकी नाही. कारण, माझे सासरे पोलीस पाटील असले तरी राजन पाटल्याच्या पुढ जाऊ कधीच त्यांनी निर्णय घेतले नाहीत. त्यांनी कायम यांच्या पातळीवरच सर्व प्रश्न मिटवलेत असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, माझ्या मुलावर खोटी अॅट्रॉसीटी दाखलं केली आणि त्याचं करीअर बरबाद केलं असाही थेट आरोप त्यांनी केला आहे.
ही लढाई माझी आहे. माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगते, मला हे करायला कुणीही सांगितलं नाही. आमचे नेते सांगतायेत मी असं करते असं नाही.आजही मी कुठही माझ्या मुलासोबत एकटी जाते. कधी मुलगा नसतो तर मी मुंबईपर्यंत एकटीच जाते असंही त्या म्हणाल्या आहेत. परंतु, आता अनगरमध्ये राहण्यासारखी परिस्थिती नाही. खूप वाद आहेत. हे खूप घातकी लोक आहेत, त्यामुळे त्या गावात राहण्यासारख नाही. परंतु, माझा मी आणखी तिसरा डोळा उघडलेला नाही असाही थेट इशारा त्यांनी दिला आहे.
आमची जमिन काय यांच्या घशात जाणार नाही. माझ्या तरण्या मुलाचं मृत्यूपत्र केलंय मी. हे सांगताना उज्वला यांच्या डोळ्यात आश्रू आले. परंतु, हे सगळं आमच्यावर करण्याची यांच्यामुळे वेळ आली आहे. परंतु, माझी जी काही प्रॉपर्टी आहे ती यांच्या घशात जाणार तर नाही असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. हा संघर्ष खूप अवघड आहे. आणि आजही सर्व चार दिवस येतील पण पुढे काय असा प्रश्नही उज्वला यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर जर मी तोंड उघलच तर यांना फिरताही येणार, आणि मी जिवंत आहे तोपर्यंत हा संघर्ष आता थांबणारही नाही असंही त्यावेळी म्हणाल्या आहेत.
