Year Ender 2023 : कोरोनानंतर बॉलिवूडला उंचीवर नेणारं वर्ष 2023; ‘या’ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ

Year Ender 2023 : कोरोनानंतर बॉलिवूडला उंचीवर नेणारं वर्ष 2023; ‘या’ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ

Year Ender 2023 : 2023 हे वर्ष (Year Ender 2023) खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये आणि एकंदरीतच चित्रपटसृष्टीमध्ये विशेष लक्षणीय राहिलं आहे. 2024 हे नववर्ष सुरू व्हायला अगदी काही तास शिल्लक राहिले असताना. मनोरंजन क्षेत्रामध्ये यंदाच्या वर्षात कोणकोणत्या चित्रपटांची जादू चालली त्यावर एक नजर टाकूयात…

विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले

यंदाच्या वर्षी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने तीन वेळा प्रेक्षकांना खेळवून ठेवलं. त्यामध्ये रणबीर कपूरची आणि देओल फॅमिलीची जादू देखील प्रेक्षकांना वेड लावून गेली. चला तर पाहूयात 2023 मधील दहा चित्रपट ज्यांनी बॉक्स ऑफिससह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं…

पठाण

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा हा चित्रपट. 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यातच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं होतं. तर दिपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरून चित्रपट वादातही सापडला होता.

गदर 2

त्यानंतर सनी देओलचा गदर 2 या चित्रपटाने 22 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना देशभक्तीने जागृत केले. 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटातील गाणी, डायलॉग यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रेमात पडले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल पाचशे कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

Ram Mandir Ayodhya : राम मूर्ती आणि मंदिराची काही खास वैशिष्ट्ये… LetsUpp Marathi

रॉक और रानी की प्रेम कहानी

या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. तसेच करण जोहरने गेले किती दिवसांपासून दिग्दर्शनामध्ये केलेलं कमबॅक या चित्रपटामधून यशस्वी ठरलं.

ओ माय गॉड 2

गदर चित्रपटासोबतच रिलीज झालेला अक्षय कुमारचा ओ माय गॉड टू हा चित्रपट देखील तेवढाच गाजला. ओ माय गॉड या चित्रपटाचा दुसरा भाग असलेल्या या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटांमधून शालेय जीवनातील लैंगिक शिक्षणाचे महत्त्व या सामाजिक विषयाला हात घातला होता.

जवान

यादरम्यान शाहरुखचा दुसरा चित्रपट जवान हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. जबरदस्त ॲक्शन आणि ड्रामा असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बघतोय कमाई करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. यातील वडिलांच्या डायलॉगने प्रेक्षकांना शाहरूखचा मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण आणि एसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वादाची आठवण करून दिली.

आदीपुरुष

एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिर होत असताना. त्यादरम्यानच आलेला दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आदीपुरुष या चित्रपटाची प्रचंड चर्चा राहिली. तसेच अनेक धार्मिक मुद्द्यांवरून या चित्रपटाला ट्रोल देखील करण्यात आलं. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. ज्यामध्ये अभिनेत्री कृती सेनन सीतेच्या भूमिकेत होती.

द केरला स्टोरी

आयसिस या दहशतवादी संघटनेच्या अत्यचाराची सत्य घटना असलेल्या या चित्रपटाने देखील यावर्षी प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला. अदा शर्मा या अभिनेत्रीने यामध्ये मुख्य भूमिका साकारली तर सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. अनेक ठिकाणी या चित्रपटाला सरकारकडून टॅक्स फ्री करण्यात आलं होतं. तर पश्चिम बंगालमध्ये चित्रपटाला बॅन देखील करण्यात आलं होतं. मात्र या सर्व वादानंतर या चित्रपटाने चांगली कमाई केली.

टायगर 3

त्यानंतर सलमान खानच्या टायगर सीरीजमधला टायगर 3 हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची म्हणावी अशी जादू प्रेक्षकांवर चालली नसली. तरी देखील बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यामध्ये तो यशस्वी झाला. या चित्रपट वर्षभरातील दहा चित्रपटांमध्ये समाविष्ट झाला आहे. या चित्रपटामध्ये देखील अभिनेत्री कैटरीना कैफ सलमानसोबत मुख्य भूमिकेत होती.

ऍनिमल

त्यानंतर वर्षाच्या अखेरीस म्हणजे 1 डिसेंबरला आलेला रणवीर कपूर आणि बॉबी देओल या नायक खलनायक जोडीने गाजवलेला ऍनिमल हा चित्रपट. दक्षिणात्य दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. तब्बल महिनाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने रणबीरच्या करिअरला एका उंचीवर नेऊन ठेवले. तर बॉबी देओलच्या अभिनयाने प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. महिन्याभरात 500 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला.

डंकी

त्यानंतर वर्षाच्या अखेरीस आला आहे. तो म्हणजे शाहरुख खानचा तिसरा चित्रपट डंकी. या चित्रपटाने हे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्याचबरोबर डंकी फ्लाईट या आंतरराष्ट्रीय विषयाला या चित्रपटातून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर हे होते 2023 या वर्षातील टॉप टेन चित्रपट ज्यांनी बॉक्स ऑफिससह प्रेक्षकांच्या मनावर देखील अधिराज्य गाजवलं आणि बॉलीवूड साठी 2023 वर्ष लक्षणीय ठरवलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube