Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसच राज्यात महायुतीचा चेहरा?

  • Written By: Published:
Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसच राज्यात महायुतीचा चेहरा?

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फायरब्रँड नेते असतील याचे संकेत भाजपने (BJP) दिले आहेत. लोकसभेची तयारी आणि प्रचाराचा झंझावात याचे केंद्र हे फडणवीस राहतील यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यभर ‘संकल्प यात्रा’ यात्रा काढण्याची तयारी करत आहे. यासाठी कार्यक्रम आणि नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवणं, ही महाविकास आघाडीची घोडचूक ठरणार?

२०१९च्या निवडणुकीपूर्वी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढली होती. या यात्रेला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला होता. तो पाहता आता महायुतीत देखील एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यापेक्षा फडणवीस महायुतीचा चेहरा असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.

‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका

राज्यात भाजपतर्फे संकल्प यात्रा काढण्यात येणार आहे. त्याचा प्रमुख चेहरा फडणवीस असतील. या यात्रेच नियोजन फडणवीस यांच्याकडे दिले जाणार आहे. ५ फेब्रुवारीपासून यात्रा सुरू होईल. राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे. यात्रेच्या दरम्यान लोकसभेच्या शहरी भागात फडणवीस यांची जाहीर सभा घेण्याचे नियोजन देखील करण्यात येणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

फडणवीस यांच्या दौऱ्याविषयी प्राथमिक चर्चा झाली आहे. या दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. दौरा कधी सुरू होईल, कसा असेल. सुरुवात कुठून होईल ? सभा कुठे असतील. याविषयी काहीही नक्की झालेले नाही, अशी माहिती मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

तर दौऱ्याचे नियोजन पक्षपातळीवर ठरेल. पक्ष याबाबत माहिती देईल, असे फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. फडणवीस यांच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना स्थान असेल की नाही. फडणवीस यांच्या सभेत मुख्यमंत्री असतील का ? महायुतीच्या सर्वच्या सर्व ४८ लोकसभा फडणवीस यांचाच चेहरा असेल का? असे अनेक प्रश्न या दौऱ्यामुळे उपस्थित होत आहेत. पण भाजपतर्फे होत असलेली तयारी पाहता आगामी लोकसभेसाठी महायुतीतील राज्यातील चेहरा एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस असतील हे मात्र नक्की आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube