‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका

‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका

Rahul Gandhi On Agniveer Scheme : देशात बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया चालली असल्याची म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘अग्निवीर’(Agniveer Scheme) योजनेचा दाखला देत या योजनेमुळे देशातल्या दीड लाख तरुणांचं जीवन सरकारने संपवल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेसच्या स्थापनेदिनानिमित्त नागपुरात आयोजित महारॅली सभेत राहुल गांधी बोलत होते.

ST बॅंकेच्या संचालक पदावरून सौरभ पाटलांची हकालपट्टी, गुणरत्न सदावर्तेंचे बॅंकेवरील वर्चस्व संपुष्टात!

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मागील 10 वर्षांत मोदींनी किती लोकांना रोजगार दिलायं? असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशातील तरुणांची शक्ती वाया जात असून तरुण आज-काल नोकरी करीत नाही. दिवसभरातील 7 ते 8 तास तो तरुण फोनवर सोशल मीडियावर सक्रिय असतो, त्यामुळे त्याची शक्ती वाया जात असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

किंग खानचा चित्रपट लवकरच पार करणार 300 कोटींचा टप्पा; आठवड्यात कमावले ‘इतके’ कोटी

अग्नीवीर योजनेच्या घोषणेनंतर माझ्याकडे काही तरुण आले होते. योजनेच्या घोषणेआधी जवळपास दीड लाख तरुणांची आर्मी भरतीसाठी शारीरीक चाचणी घेण्यात आली होती. नौदलानेही त्यांतील काही तरुणांची चाचणी घेतली होती. या चाचणीमध्ये तरुण पास झाले, मात्र, या योजनमुळे त्यांना सेवेत दाखल करुन घेतलं नाही, अग्नीवीर योजनेतही या तरुणांना डावलण्यात आल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे तरुणांचं जीवनच संपल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘भाजपचं राजकारण की व्यवसाय माहित नाही’; राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचे खडेबोल

या तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना होती. ते माझ्यासमोर रडत होते. सरकारने आमचं जीवन संपवलं, आमची चेष्टा केलीयं. गावात आम्हाला ‘छूटे सैनिक’ असं म्हटलं जात आहे. या तरुणांना अग्नीवीर योजनेतूनही फेकून दिलं. तरुणांचं जीवन संपवून आम्ही देशभक्त आहेत, यामुळे देशाचा फायदा होणार असल्याचं नारा सत्ताधाऱ्यांकडून दिला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.


काँग्रेसमुळेच जनतेला मतदानाचा अधिकार :

स्वातंत्र्यानंतर इथल्या महिलेला, दलितांना, आदिवासींसह सर्व जनतेला मतदानाचा अधिकार गांधी-नेहरु-आंबेडकरांनी काँग्रेसच्या माध्यमातून मिळवून दिला आहे. या विचारधारेविरोधात भाजपची विचारसरणी आहे. स्वातंत्र्याआधी दलित, आदिवासी, महिलांना अधिकार नव्हते. स्वातंत्र्यानंतरच हे अधिकार मिळाले आहेत. ही आरएसएसची विचारधारा आम्ही बदलली असल्याची जहरी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube