राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात, कुस्तीपटूंसोबत केले दोन हात; पाहा फोटो

1 / 7

राहुल गांधी आज सकाळी 6.15 वाजता हरियाणातील कुस्ती आखाड्यात पोहोचले. तिथं पैलवानांना भेटले आणि बजरंग पुनियासोबत कुस्तीही खेळली.

2 / 7

राहुल गांधी सकाळीच छारा गावातील 'वीरेंद्र आखाडा' येथे पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी पुनिया आणि इतर कुस्तीपटूंशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधींनी बराच काळ आखाड्यात घालवला.

3 / 7

भारतीय कुस्ती महासंघासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हरियाणा येथे जाऊन कुस्तीपटूंची भेट घेतली.

4 / 7

कुस्तीपटूंनी सांगितले, राहुल गांधी सकाळी 6.15 वाजता आखाड्यात पोहोचले. त्यानी आम्हाला आमच्या दैनंदिन दिनचर्याबद्दल विचारले. त्यानंतर आम्ही कसे व्यायाम करतो ते पाहिले आणि त्यांनी काही व्यायाम देखील केले.

5 / 7

राहुल गांधींनी दूध, बाजरीची भाकरी आणि भाजी खाल्ली. यानंतर काही शेतकऱ्यांनी राहुल गांधींना पिकवलेल्या भाज्या दिल्या. तिथून जाताना राहुल गांधींही भाज्यासोबत घेऊन गेले.

6 / 7

दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिने तिचे खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. तर ऑलिम्पिक पदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.

7 / 7

भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधींची भारत न्याय यात्रा 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी निघणार आहे. मुंबईमध्ये 20 मार्च रोजी इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सांगता होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज