ST बॅंकेच्या संचालक पदावरून सौरभ पाटलांची हकालपट्टी, गुणरत्न सदावर्तेंचे बॅंकेवरील वर्चस्व संपुष्टात!
Saurabh Patil : एसटी बँकेत (ST Bank) 480 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे हजारो एसटी वाहन चालक व कर्मचाऱ्यांची खाती असलेली एसटी बँक आता दिवाळखोरीकडं निघाली आहे. ही बँक वाचवायची असेल तर सहकार विभागाने आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत होती. दरम्यान, एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कोणत्याही पात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळे एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (Saurabh Patil) यांना पदावरून हटवण्यात आले.
Thane News : ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब? पोलिसांना मिळाला मेल; बॉम्बस्कॉड घटनास्थळी
एसटी कर्मचारी बँकेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. एसटी बँकेचे संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. अशातच आज एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सहकार आयुक्तांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे निकटवर्तीय आहेत. आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय या पदावर नियुक्ती केल्याने सहकार विभागाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरआ आता त्यांच्यावर ही थेट कारवाई करण्यात आली आहे.
Vijayakanth Death: दिग्गज अभिनेते विजयकांत यांचे निधन; सोनू सूदने व्यक्त केला शोक
एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकासाठी किमान आठ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. याशिवाय वयाची अट ३५ वर्षे आहे. मात्र सौरभ पाटील यांचे वय सुमारे 25 वर्षे आहे. याशिवाय त्यांना आठ वर्षांचा अनुभवही नाही. तसेच आरबीआयकडून परवानगी घेणे हेही बंधनकारक असते. मात्र सौरभ पाटील यांनी कोणतेही निकष पूर्ण केले नाहीत. तरीही त्यांची व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली गेली होती. त्यामुळं सहकार आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली.
सहकार आयुक्तांनी एसटी बँकेला पत्र लिहून आठवडाभरात सौरभ पाटील यांना हटवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय याच कालावधीत नवीन संचालकांच्या नियुक्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय इतर सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सौरभ पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानं हा गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एसटी बँकेवर गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची सत्ता होती. त्यांचे नातेवाईक सौरभ पाटील हे संचालक झाले होते. पण, ते कोणत्याही निकषात बसत नव्हते. त्यामुळं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईमुळं सदावर्ते यांच्या बॅकेवरील अस्तित्व संपुष्टात आले.