ST Bank प्रकरणी सदावर्ते दाम्पत्याला झटका! सहकार खात्याकडून दोघांचंही संचालकपद रद्द

ST Bank प्रकरणी सदावर्ते दाम्पत्याला झटका! सहकार खात्याकडून दोघांचंही संचालकपद रद्द

ST Bank Cancellation of directorship of Sadavarte couple : एसटी कर्मचारी बँकेचा ( ST Bank) मुद्दा गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. त्यात आता गुणरत्न सदावर्ते ( Sadavarte couple ) आणि त्यांच्या पत्नीला सहकार खात्याकडून दणका देण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीरपणे पोटनियम मंजूर करण्यासाह इतर बेकायदेशीर कार्यवाहींप्रकरणी सहकार खात्याने सदावर्ते पती-पत्नी दोघांचेही संचालकपद रद्द ( Cancellation of directorship ) केले आहे.

एसटी कामगार संघटनेचे अध्यक्षांची सहकार आयुक्तांकडे तक्रार…

एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यावर नथुराम गोडसे यांचे फोटो प्रिंट करण्यात आले होते. वास्तविक पाहता एसटी बँक, एसटी कर्मचारी यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता.

नगरमध्ये शुक्रवारी निर्भय बनो सभा; अ‍ॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरींची उपस्थिती

त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे पूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना देणे आवश्यक होते. परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हवे त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. मुख्य म्हणजे पोटनियम बदलाची सुचना सभासदांना देणे बंधनकारक होती. ती देखील देण्यात आली नव्हती.

सहकार खात्याकडून कारवाई…

त्यावर आता सहकार खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार बँकेचे तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नींची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणला तो ठरावही सहकार खात्याने रद्द केला. त्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत. बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत असेही प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररित्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे. एसटी बाहेरच्या लोकांना बॅंकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे.

एकेकाळी ब्रेकअपपर्यंत पोहचलं, आता पॉवर कपल म्हणून ओळखले जातात करण सिंग आणि बिपाशा

यामुळे सहकार खात्याने सदावर्ते दांपत्याला चांगलीच कायद्याची चपराक दिली आहे. मागील 70 वर्षात एसटी को-ऑपरेटिव बँकेवर अशी वेळ आलेली नव्हती. जी आज सदावर्ते यांनी आणून ठेवलेली आहे. आशिया खंडात नंबर एकची बँक असलेली एसटी ऑपरेटिव्ह बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचे काम सदावर्ते दापत्यांकडून होत होते. त्याला काहीसा आळा यामुळे बसलेला आहे.

एकीकडे लग्नसराई तोंडावर असताना एसटी कर्मचारी यांना कर्जवाटप होत नसल्यामुळे मुला-मुलींची लग्न करण्यात मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे हे संचालक मंडळ महागड्या हॉटेलमध्ये मीटिंगच्या नावाखाली नाच-गाण्यांमध्ये मशगुल आहे. नवनवीन गाड्या संचालक मंडळाकडून खरेदी करण्यात येत आहेत. दुसरी कडे बेकायदेशीर कर्मचारी भरती बँकेत सुरू आहे. परंतु आता या भरतीला देखील सहकार खात्याने स्थगिती दिली आहे. असं असताना देखील कायदा आपला घरचाच आहे. असं समजून बेकायदेशीर नोकर भरती एसटी बँकेत सुरू आहे. याचीही तक्रार करण्यात आली असुन त्याचीही वरीष्ठ पातळीवर चौकशी होऊन गंभीर कारवाईचे संकेत आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज