Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का! एसटी बँकेच्या 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का! एसटी बँकेच्या 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा

Gunratna Sadavarte : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte ) यांच्या नेतृत्त्वाखाली एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव बँक लिमिटेडमध्ये निवडूण आलेल्या पॅनेलमध्ये मोठा भूकंप झाला आहे. कारण एसटी बँकेच्या 19 पैकी बारा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसलाय. कारण या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचे वर्चस्व राहणार नाही.

Ayodhya Ram Mandir च्या उद्घाटन सोहळ्याचं खास निमंत्रण; कोण-कोणते बॉलिवूड स्टार्स लावणार हजेरी?

गेल्या वर्षी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी अगोदर या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील पत्र घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केलं. महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपलं पॅनलही उतरवलं. सदावर्ते यांच्या याच पॅनलने 19 पैकी बारा जागांवर विजय मिळवला. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बँकेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप याच निवडून आलेल्या संचालकांकडून केले जात आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर या संचालकांनी आज (26 डिसेंबरला) तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Share Bazar : शेअर बाजारात मोठी उसळी! एका दिवसात गुंतवणूकदार मालामाल…

बँकेतील 14 संचालक सदावर्तेंविरोधात :
एसटी कर्मचारी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले होते की, एसटी कर्मचारी सहकारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचा आम्ही मार्गदर्शक म्हणून स्वीकार केला, पण ते आता सर्वांचे मालक व्हायला निघाले आहेत. त्यामुळे आमच्यासह एसटी जनसंघाने विरोध केला. बँकेच्या 19 संचालकांपैकी 14 जण सदावर्तेंच्या विरोधात आहेत. त्यांना सदावर्तेंकडून धमक्या अन् आलिशान गाड्यांची आमिषं दाखवल्याचा गंभीर आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केला होता.

त्यानंतर या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी (Financial check)करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -1 यांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube