एकेकाळी ब्रेकअपपर्यंत पोहचलं, आता पॉवर कपल म्हणून ओळखले जातात करण सिंग आणि बिपाशा

एकेकाळी ब्रेकअपपर्यंत पोहचलं, आता पॉवर कपल म्हणून ओळखले जातात करण सिंग आणि बिपाशा

Bipasha and Karan Anniversary : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘पॉवर-कपल’ (Power Couple) करण सिंग ग्रोव्हर ( KARAN SINGH GROVER) आणि बिपाशा बसू (BIPASHA BASU) हे नेहमीच सोशल मीडियावर (social media) सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. आज या ‘पॉवर-कपलनं एकमेकांवर प्रेम दाखवून काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. करणने अनेकदा बिपाशाला आपली मैत्रीण म्हंटल आहे. “ती आयुष्यात खूप फोकस आहे आणि ती कायम मला सर्वोत्तम सल्ला देते. तिला सर्व काही सांगणे माझ्यासाठी बंधनकारक आहे असं करणने यावेळी सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)


आता दोघेही या विशेष दिवसाच्या शुभेच्छा एकामेंकाना सोशल मीडियाच्या माध्यामातून देताना दिसत आहेत. बिपाशानं एक पोस्ट शेअर करत पती करणला लग्नाच्या आठव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिलं, “8व्या मंकी ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. आपण आपल्याला आयुष्यातील प्रत्येक दिवस एकत्र आणि कायम साजरा करणे कधीही थांबवणार नाही. या व्हिडिओमध्ये लग्नातील 2016 ते 2024 सालापर्यंतचे विशेष क्षण टिपले आहेत.

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूनं शेअर केला व्हिडिओ : या व्हिडिओत पोस्टमध्ये बिपाशा आणि करणचे चाहते कमेंट करून या ‘पॉवर-कपल’ला मोठ्या प्रमाणात कॉमेंट्स करत आहेत. व्हिडिओमध्ये हे ‘पॉवर-कपल’ एकत्र खूप खुश दिसत आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये करण आणि बिपाशाची लेक देवी देखील आहे. या ‘पॉवर-कपलनं काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. आता करण त्याची लीक देवी आणि पत्नीसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. या ‘पॉवर-कपल’साठी हा दिवस खूप विशेष आहे.

Bhumi Pednekar :’ ….म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये यंग ग्लोबल लीडर असल्याचा अभिमान’; अभिनेत्रीने थेटच सांगितलं

वर्कफ्रंट : सोबतच सोशल मीडियावर करण सिंग ग्रोव्हरनं त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एक सुंदर ठिकाण दाखवत आहे. तसेच काल रात्री त्यानं समुद्रकिनाऱ्यावरून आपल्या सोबतचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला. हे जोडपे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. दरम्यान करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी ‘फायटर’ या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 353 कोटीची कमाई केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज