Bipasha Basu Birthday : लोकांची पर्वा न करता खुलेपणाने जगणारी; बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफुल बिपाशा!
Bipasha Basu Birthday : 90 चं दशक संपत असताना आणि 2000 साल सुरू होत असताना एक सावळी सुंदर मुलगी जी दिल्ली आणि कोलकाता शहरांमध्ये वाढली होती. तिने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी तिने मॉडलिंगला सुरुवात केली आणि मुंबईत पाऊल ठेवलं. तो काळ असा होता. जेव्हा खूप कमी अभिनेत्री बोल्ड सीन्स शूट करू शकत होत्या. मात्र बिपाशा बासूने (Bipasha Basu Birthday) बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि तिची सर्वत्र चर्चा सुरू झाली.
Dance Plus Pro: ‘डान्स प्लस प्रो’चा मंच होणार ‘सैराटमय’, मंचावर पोहोचले रॅपर किंग
मॅग्झिन्सच्या कव्हर पेजवर तिचे बोल्ड आणि बिनधास्त फोटो लागले. मात्र यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. या प्रवासादरम्यान तिच्या रंगावरून तिची खिल्ली उडवली जात होती. मात्र तिने हार मानली नाही. समाजाची कुठलीही पर्वा न करता तिने तिच्या शर्तीवर जीवन जगलं. हीच बिपाशा आज 7 जानेवारीला तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल…
Ajit Pawar : नाट्य संमेलनाचं निमंत्रण नाही म्हणत अजितदादांनी पवारांसोबत एकत्र येणं टाळलं?
बिपाशाचा जन्म 7 जानेवारी 1979 ला दिल्लीत बंगाली कुटुंबात झाला. तिचे वडील हीरक बसू हे सिव्हिल इंजिनिअर होते. तर आई एक गृहिणी मोठी बहीण विदिशा आणि लहान बहिण विजयतारा यांच्यामधील बिपाशा ही होती. तर एकदा बिपाशांनी आपल्या नावाचा अर्थ सांगताना म्हटलं होतं बिपाशा म्हणजे दृढ इच्छा. तसेच एका नदीचे नाव देखील बिपाशा आहे. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत तिने दिल्लीत शिक्षण घेतले. त्यानंतर तिचं कुटुंब कोलकात्यांमध्ये स्थायिक झालं. जिथे शाळेमध्ये तिला लेडी डॉन म्हटलं जायचं. तेव्हापासूनच तिची बोल्ड आणि दमदार पर्सनॅलिटी होती.
Chhagan bhujbal: जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर काय म्हणाले भुजबळ?
त्यानंतर 1996 ला कोलकातामध्ये एका हॉटेलमध्ये बिपाशाला मॉडेल मेहेर जेसिया रामपाल हिने पाहिलं. त्यांनी तिला मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर लगेचच तिने सुपर मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये ते विजयी झाली. त्यानंतर मियामी या ठिकाणी फोर मॉडेल्स सुपर मॉडेल ऑफ द वर्ल्ड कॉम्पिटिशनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलं आणि इथूनच तिच्या करिअरला सुरुवात झाली. याच दरम्यान अभिनेता डिनो मारिया आणि बिपाशाने एका मॅक्झिनसाठी एक बोल्ड जाहिरात केली होती. त्यामुळे ते वादातही सापडले होते. याच दरम्यान बिपाशा आणि डिनो एकमेकांना डेट करत होते.
Chhagan bhujbal: जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर काय म्हणाले भुजबळ?
जेव्हा बिपाशाने पहिल्यांदा सुपर मॉडेल कॉम्पिटिशन जिंकली. त्यावेळी त्या स्पर्धेच्या जजच्या पॅनलमध्ये अभिनेते विनोद खन्ना होते. त्यावेळी ते मुलगा अक्षय खन्ना याच्यासह ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून बिपाशाला लॉन्च करू इच्छित होते. मात्र तेव्हा ती लहान असल्याने तिनेही ऑफर स्वीकारली नाही. त्याचबरोबर जया बच्चन यांना देखील वाटत होते की, अभिषेक बच्चनसोबत जे पी दत्ता यांचा ‘आखरी मुगल’ या चित्रपटात बिपाशाने काम करावं. मात्र त्यानंतर हा चित्रपट रद्द झाला. त्याऐवजी चित्रपटाची स्क्रिप्ट बदलून रिफ्यूजी हा चित्रपट बनवण्यात आला. यात देखील बिपाशाला सुनील शेट्टी सोबतचा सोबतची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र ती देखील तिने धुडकावून लावली.
Video : ससून रूग्णालयात राडा; अजितदादांसमोर भाजप आमदाराची NCP पदाधिकाऱ्याला मारहाण
अखेर 2001 मध्ये बिपाशाने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. अक्षय कुमारसोबत अजनबी चित्रपटातील पहिल्यांदा दिसली. तिचा हा पहिलाच चित्रपट यशस्वी झाला. यातूनच तिची इमेज गोल्ड बनली. त्यानंतर 2002 मध्ये बिपाशाने बहुचर्चित अशा राज चित्रपटात काम केलं. ज्यामधील तिचे तिचा अभिनय आणि तिच्या बोल्डनेसची प्रचंड चर्चा झाली. चित्रपटातील डायलॉगपासून गाण्यांपर्यंत सर्व काही हिट होतं. विक्रम भट यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट त्यानंतर बिपाशांनी केले. ज्यामध्ये जिस्म, जमीन, मदहोशी, बरसात, नो एंट्री, धूम टू, फिर हेरा फेरी यांच्यासह दक्षिणेत चित्रपटांमध्ये देखील ती दिसली.
सध्या बिपाशा चित्रपटांपासून दूर आहे. या अगोदर 2015 मध्ये पती करण सिंह ग्रोवर याच्यासोबत अलोन या चित्रपटात तसेच 2020 मध्ये डेंजरस या वेब सिरीजमध्ये काम केलं होतं. बिपाशाच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर 1996 ते 2002 पर्यंत तिने डिनो मारीयाला डेट केलं. मात्र त्यानंतर त्यांचे नातं तुटलं. जॉन अब्राहमसोबत देखील बिपाशाचे नाव जोडलं गेलं. 2011 पर्यंत जॉनसोबत बिपाशाचं नातं टिकून राहिलं. त्यानंतर तिने हर्मन बावेजा याला देखील डेट केल्याचे सांगण्यात येतं. 2014 मध्ये दोघेही वेगळे झाले आणि याच वर्षी अलोन चित्रपटाच्या सेटवर बिपाशाचे ओळख करण सिंह ग्रोवरसोबत झाली. याच ओळखीचे रूपांतर 2016 मध्ये त्यांनी लग्न केलं. तर बारा नोव्हेंबर 2022 ला बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. देवी असे तिच्या मुलीचे नाव असून ती कायम सोशल मीडियावर चर्चेत असते.