Dhoom 4: आदित्य चोप्रा बनवणार जबरदस्त चित्रपट, जाणून घ्या कोण असेल दिग्दर्शक

Dhoom 4: आदित्य चोप्रा बनवणार जबरदस्त चित्रपट, जाणून घ्या कोण असेल दिग्दर्शक

Dhoom 4 Director: काला पत्थर (1979) हा चित्रपट पाहिल्यानंतर आदित्य चोप्राने (Aditya Chopra) चोरीवर आधारित क्राइम-थ्रिलर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. 2004 मध्ये तो चित्रपट रिलीज झाला होता ज्याचे नाव होते ‘धूम’ (Dhoom). जॉन अब्राहमने (John Abraham) आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावले आणि त्यानंतर दुसऱ्या भागात हृतिक रोशनने (Hrithik Roshan) सर्वांना चकित केले. तिसरा भाग आमिर खानच्या (Aamir Khan) नावावर होता पण आता ‘धूम 4’ मध्ये (Dhoom 4) कोण असणार हा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)


27 ऑगस्ट 2024 रोजी ‘धूम’ रिलीज होऊन 20 वर्षे पूर्ण होतील आणि त्यानिमित्ताने निर्मात्यांनी ‘धूम 4’ चे संकेत दिले आहेत. ‘धूम 4’चे दिग्दर्शन संजय गढवी करणार का? या फ्रँचायझीचे आधीचे चित्रपट बनवणारे विजय कृष्ण आचार्य, की आदित्य चोप्रा नव्या दिग्दर्शकाला संधी मिळणार का?, अशी चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळत आहे.

कोण असणार ‘धूम 4’चा दिग्दर्शक?

बॉलिवूड हंगामा नुसार, यशराज फिल्म्सच्या धूम फ्रँचायझीच्या चौथ्या भागाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘धूम 4’ बनवण्यात येत असल्याचं निर्मात्यांनी एका हिंटद्वारे सांगितलं आहे. अशीही बातमी आहे की अयान मुखर्जी ‘धूम 4’ दिग्दर्शित करू शकतो, परंतु अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आदित्य चोप्रा सध्या YRF SPY विश्वाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे आणि सध्या अल्फा हा चित्रपट त्यात बनवला जात आहे. यानंतर ‘धूम 4’ वर काम सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीधर राघवन आणि विजय कृष्ण आचार्य यांनी चित्रपटाच्या कथेवर काम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

Aditya Chopra : आदित्य चोप्रा यांनी शिव रवैलवर सोपवली महत्वाची जबाबदारी

अयान मुखर्जी बनवतोय ‘वॉर 2’

YRF स्पाय युनिव्हर्सचे पुढील चित्रपट ‘वॉर 2’ आणि ‘अल्फा’ आहेत. यातील ‘वॉर 2’ हा अयान मुखर्जी दिग्दर्शित करत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून त्यात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर दिसणार आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आदित्य चोप्राने अयान मुखर्जीशी चर्चा केली असून त्याने ‘धूम 4’ बनवण्यासाठी होकार दिला आहे. सध्या निर्मात्यांनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube