Video : ससून रूग्णालयात राडा; अजितदादांसमोर भाजप आमदाराची NCP पदाधिकाऱ्याला मारहाण

  • Written By: Published:
Video : ससून रूग्णालयात राडा; अजितदादांसमोर भाजप आमदाराची NCP पदाधिकाऱ्याला मारहाण

पुणे : ससून रूग्णालयात मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी राष्ट्रवादीच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या कानशिलेत लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. जितेंद्र सुरेश सातव असे मारहाण केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सातव हे राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राच्या प्रमुख आहेत. ससून रूग्णालयाच्या (Sasson Hospital) उद्धघाटन बोर्डवर नाव नसल्याने कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सातव यांच्या कानशिलात लगावल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदार कांबळे यांनी सातव यांच्या कानशिलेत लगावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कांबळे यांनी केवळ सातव यांच्याच नव्हे तर, पायऱ्यांवरून खाली उतरताना एका पोलिसालादेखील मारहाण केली. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar : नाट्य संमेलनाचं निमंत्रण नाही म्हणत अजितदादांनी पवारांसोबत एकत्र येणं टाळलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज (दि. 5) ससून रूग्णालयात तृतीयपंथीसाठी एक वेगळा वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. याचे उद्धटन पालकमंत्री असणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते होणार होते. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेवर आणि उद्घाटन बोर्डावर स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याने कॉन्टेलमेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे संतत्प झाले आणि त्यांनी थेट सातव यांच्या कानशिलेत लगावली.

Ajit Pawar : ‘कशाला खपल्या उकरून काढता?’ आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावर अजितदादांचं मोजकचं उत्तर

या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जाबाबदारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांच्याकडे होती. मात्र, स्थानिक आमदार असतानाही काबंळे यांचे नाव न आल्याने त्यांनी रागाच्या भरात सातव यांच्या कानशिलात लगावली. सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख असू त्यांनीच या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमावेळी अजित पवारांसमोरच थेट हात उचलेपर्यंत वाद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शासकीय रुग्णालयात नवीन इमारतीचे उद्घाटन असो किंवा तृतीयपंथीसाठी केलेल्या नवीन वार्ड त्याचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. यादरम्यान त्यांच्यासोबत महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, सह भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे हे उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube