Bhumi Pednekar :’ ….म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये यंग ग्लोबल लीडर असल्याचा अभिमान’; अभिनेत्रीने थेटच सांगितलं

Bhumi Pednekar :’ ….म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये यंग ग्लोबल लीडर असल्याचा अभिमान’; अभिनेत्रीने थेटच सांगितलं

Bhumi Pednekar : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही तिच्या अनोख्या भूमिकांसाठी विशेष ओळखली जाते. तिचा ‘थँक्यू फॉर कमिंग’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) भारतातील यंग ग्लोबल लीडर (Young Global Leader) असल्याचा अभिमान आहे आणि आगामी वर्षात माझ्या सिनेमासाठी खास असल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)


अभिनेत्री भूमी पेडणेकरची जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लीडर्स (YGL) म्हणून निवड करण्यात आली आहे. अभिनेत्रीचा आता जगातील एक यंग ग्लोबल लीडर म्हणून समावेश करण्यात आला. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने अभिनेत्रीने संपूर्ण जगाला चांगलीच भूरळ पाडली आहे. एप्रिल महिन्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 40 वर्षांखालील सुमारे 90 चेंजमेकर्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. जे भविष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सार्वजनिक आरोग्य, आर्थिक विकास, तंत्रज्ञान आणि टिकाऊपणा या क्षेत्रांमध्ये उत्तम प्रकारच्या बदलांना महत्वाचे स्थान देणार आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या यादीमध्ये राजकारण, व्यवसाय, नागरी समाज, कला आणि शैक्षणिक क्षेत्रातील उगवत्या कलाकारांचा समावेश असणारं आहे. अभिनेत्रींसोबत या यादीत नायका फॅशनचे सीईओ अद्वैत नायर यांचा देखील समावेश असणार आहे. सोबतच अर्जुन भरतिया, ज्युबिलंट ग्रुपचे संचालक; प्रिया अग्रवाल हेब्बर, वेदांत लिमिटेडच्या बिगर कार्यकारी संचालक; आणि शरद विवेक सागर, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, डेक्सटेरिटी ग्लोबल यांचा ही समावेश आहे.

फॅशन वीक इव्हेंटमध्ये Prerana Arora जलवा; ओपनर म्हणून केला रॅम्पवॉक

भूमी पेडणेकर पुढे सांगितलं आहे की, “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारतातील एक यंग ग्लोबल लीडर असल्याचा मला खूप अभिमान आहे. हे मला माझ्या संपूर्ण आयुष्यातील प्रत्येक मिनिट सामाज हितासाठी समर्पित करण्यास प्रवृत्त करणार असल्याचं यावेळी सांगितलं आहे. ही ओळख माझ्यासाठी आणखीचं खास असणार आहे, कारण पुढच्या वर्षी मनोरंजन सृष्टीत पदार्पण करुन मला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. जगाच्या अनेक वेगवेगळ्या भागांत बदल घडवणाऱ्यांशी संवाद साधून मला सतत प्रोत्साहन मिळते जे बदल घडवून आणण्यासाठी चर्चा करत आहेत. हे आश्चर्यकारकपणे प्रतिष्ठित व्यासपीठ मला अशा तेजस्वी मनांशी जोडण्याची आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी एक उत्तम जग मागे सोडण्यासाठी शक्ती एकत्र करण्याची संधी मिळाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube