वेदांता गेला किती दिवस सांगणार? आम्ही १५ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक आणली; उदय सामंत
Uday Samant : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) राज्य सरकारने आतापर्यंत १५ लाख ७० हजार कोटींचे एमोयू केले. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाटील की देशमुख, राज्यात काँग्रेसची ‘कमांड’ कोणाला? ‘या’ दिवशी होणार घोषणा
या पत्रकार परिषदेत बोलतांना सामंत म्हणाले, दावोस दौऱ्यात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी शिकालया मिळाल्या. विविध देशांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधला. राज्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा करता आल्या. यंदा १५ लाख ७० हजार कोटींचे एमओयू आम्ही दावोसमध्ये केले. सलग तीन वर्ष दावोसला जाण्याचा योग मला आला. मागच्या दोन वर्षात साडेसात लाख कोटींचे एमओयू केले. पहिल्या वर्षी १ लाख ३७ हजार कोटींची गंतवणूक आणली. तर दुसऱ्यावर्षी ३ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक आणली, असं ते म्हणाले.
विलास जगताप, तमनगौडा पाटलांची हकालपट्टी… पडळकरांनी दोन महिन्यातच पूर्ण केला बदला
यंदा नवी मुंबईत ५० हजार कोटींचा जेम्स आणि ज्वेलरी पार्क सुरू होत आहे. याला दोन-तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. गडचिरोलीतही प्रकल्प आणला, असं ते म्हणाले.
विरोधक केवळ टीका करत आहेत. वेदांत गेला हे विरोधक किती दिवस सांगणार आहेत? आम्ही १५ लाख कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात आणलेत. रायगडमध्ये JWS चा प्रकल्प सुरू होत आहे. कोका-कोलाचा प्रकल्प पुढील तीन महिन्यात प्रोडक्शन सुरू करेल, असं सांगत रत्नागिरीत एखादा प्रकल्प यायचा असेल तर संघर्ष समिती तयार होतात हे दुर्दैवी आहे,असंही ते म्हणाले.
ते आमच्यात दरी तयार करताहेत…
यावेळी त्यांनी संजय राऊंतावरही निशाणा साधला. ते म्हणाले, एखाद चांगलं काम करत असताना विरोधक विरोध करत आहेत. मी दावोसल्या गेल्यानंतर राजकीय पत्रकार परिषद झाल्या. अनेकांनी माझ्यावर टीका केली. नवा उदय होणार असं सांगत आमच्यात दरी निर्माण कार्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, उद्यापासून अखंड महाराष्ट्रात आभार दौरा सुरू होईल. तेव्हा अनेक जन शिंदे गटात येतील, असंही ते म्हणाले.
ऑपरेशन टायगर रत्नागिरीतून सुरू होणार…
ऑपरेशन टायगर रत्नागिरीपासून सुरू होत आहे. पण आधीच ते ऑपरेशन सुरू झालं. लांजा राजापूर येथील काहींनी शिवसेनेत प्रवेशही केलाय. आणखी रत्नागिरी जिल्ह्यातील १० ते १२ माजी आमदार प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्विम महाराष्ट्रातले आहेत. तर, काही लोक असे आहेत जे आम्ही येतो असे म्हणतात, पण त्यांना आम्ही घेणार नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.