CM देवेंद्र फडणवीसांचे झ्युरिकमध्ये मराठी बंधू-भगिणींकडून जल्लोषात स्वागत, पाहा फोटो…

Devendra Fadnavis : परकीय गुंतवणूक राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शनिवारी मध्यरात्री दावोसच्या दौऱ्यावर गेले.

फडणवीस दाओसच्या दौऱ्यावर असताना झ्युरिक येथील मराठी भगिनींनी आणि बांधवांनी मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

झ्युरिक येथील मराठी भगिनींनी फडणवीस यांचे औक्षण करून दावोसमध्ये स्वागत केलं.

यावेळी फडणवीसांनी सर्वांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी चिमुकल्यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे चित्र साकारले होते. त्यांचं फडणवीसांनी कौतूकं केलं.

यानंतर फडणवीस यांना सोशल मीडियावर एक पोस्ट करत झ्युरिक येथील मराठी भगिनींचे आणि बांधवांचे आभार मानले.
