Bipasha-Karan Revealed Daughter Face: बिपाशाच्या चिमुकलीची पहिली झलक; चाहते म्हणाले…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T145732.400

Bipasha Karan Revealed Daughter Face: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लहान बेबीचे आगमन झाले होते. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवी (Devi) असे ठेवले आहे.

बिपाशा आणि करण यांनी देवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या शेअर केलेल्या फोटोंमध्ये देवीचा चेहरा दिसत नव्हता. आता बिपाशाने देवीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पहिल्यांदा देवीचा चेहरा बिपाशाच्या चाहत्यांना बघायला मिळाला आहे. बिपाशानं बासूने बुधवारी (5 एप्रिल) रात्री देवीचे काही खास फोटो शेअर केले आहे.

या फोटोमध्ये देवीच्या चेहऱ्यावर मस्त अशी स्माइल दिसत आहे. बिपाशाने देवीच्या फोटोला कॅप्शन देखील दिले आहे, ‘हॅलो वर्ल्ड, माझं नाव देवी आहे.’ बिपाशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी ही पिंक कलरच्या फ्रॉकमध्ये दिसली आहे. तर या फ्रॉकवर ‘डॅडीज प्रिंसेस’ असं लिहिलेलं स्टिकर लोगो देखील दिसून येत आहे. देवीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा जणू वर्षावच केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)


बिपाशाने शेअर केलेल्या देवीच्या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री दिया मिर्झानं, ‘गॉड ब्लेस यू देवी’ अशी कमेंट केली. तर मलायकानं, ‘OMG’ अशी कमेंट केली आहे. तसेच अभिनेता अभिषेक बच्चन, सुझेन खान, आरती सिंह यांनी देखील बिपाशाच्या मुलीच्या फोटोला कमेंट्स केल्या आहेत.

Phakaat Teaser: प्रेक्षकांमध्ये उडणार हास्याचे फवारे, बहुचर्चित ‘फकाट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

बिपाशा आणि करणची लव्ह स्टोरी
बिपाशा आणि करणची पहिली भेट ही एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हे दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. यानंतर २०१६ मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकले. आता लग्नानंतर ६ वर्षांनी करण आणि बिपाशा आई- बाबा झाले आहेत. धूम 2, फिर हेरा फेरी, नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं कुबूल है, दिल मिल गए, दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे. बिपाशा आणि करणच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube