Phakaat Teaser: प्रेक्षकांमध्ये उडणार हास्याचे फवारे, बहुचर्चित ‘फकाट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T133301.951

Phakaat Teaser: ‘फकाट’ (Phakaat Teaser) या चित्रपटाच्या टीझरमध्ये हेमंत ढोमेची (Hemant Dhome) भूमिका अतिशय रंजक आहे. (teaser released) प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके, धमाकेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता परत एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत. ‘फकाट’ या नावाचा चित्रपट धिंगाणा घालायला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Phakaat – Marathi Film (@phakaatfilm)


चित्रपटाच्या या आगळ्यावेगळ्या नावावरून हा चित्रपट खूपच अफलातून असल्याचे दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला आतंकवादी आणि सैनिकांची चकमक, अंगावर शहारे आणणारा गोळीबाराचा मोठा आवाज आणि या दरम्यान एक हायली कॉन्फिडेन्शिअल माहिती असणारी फाईल उघडताना दिसत आहे. या चित्रपटात सैनिकाच्या वेशात नितीश चव्हाण हे दिसून येत आहेत.

एका बाजूला असे संवेदनशील चित्र दिसत असतानाच दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे या जिगरी दोस्तांची धमाल देखील दिसत आहे. अचानक या दोघांच्या हातात ती फाईल पडते आणि त्यांच्या डोक्यात एक जबराट कल्पना आल्याची दिसून येत आहे. या स्वप्नांच्या दुनियेमध्ये जगत असतानाच त्यांच्या आयुष्यात पुढे काय घटना घडतात, त्यातून ते दोघे कसा मार्ग काढणार, पुढे मिळालेल्या फाईलचं काय होतं? ती फाईल घेऊन ते दोघे कुठे जाणार? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा चित्रपटाचा टिझर पाहिल्यावर होणार आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha : “बॅंड बाजा वरात घोडा…” दिल्ली नव्हे लंडनमध्ये होणार परिणीती-राघव यांचा साखरपुडा

 

Bipasha-Karan Revealed Daughter Face: बिपाशाच्या चिमुकलीची पहिली झलक; चाहते म्हणाले…

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, १९ एप्रिल रोजी आपल्या चित्रपटगृहात झळकणाऱ्या या ‘फकाट’च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोड पुन्हा एकदा चाहत्यांना भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. शिवाय या चित्रपटात अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका साकारले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube