Parineeti Chopra Raghav Chadha : “बॅंड बाजा वरात घोडा…” दिल्ली नव्हे लंडनमध्ये होणार परिणीती-राघव यांचा साखरपुडा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 28T152610.066

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबतच्या डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असून येत्या 10 एप्रिलला लंडनमध्ये (London) त्यांचा साखरपुडा होणार आहे. साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आला असला, तरी देखील परिणीती किंवा राघव यांनी त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना काही देखील सांगितले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


सध्या परिणीती चोप्राचा विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती लंडनमध्ये जात असल्याचे चाहत्यांना सांगत आहे. मुंबई विमानतळावर परिणीती स्पॉट झाली असून एका चाहत्यांनी तिला साखरपुड्यासंबंधित सवाल केला असता. त्यांच्या सवालावर परिणीती लाजत म्हणाली की, मी लंडनमध्ये जात आहे. तुम्हाला बोर्डिंग पासदेखील दाखवू शकते.

परिणीतीच्या या व्हिडीओवर आपच्या प्रचारासाठी परिणीती लंडनला जात आहे, आता साखरपुडा करुनच ये, अशा कमेंट्स प्रेक्षकांकडून केले जात आहेत. परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंचा चोप्रा, निक जोनस आणि त्यांची कन्या मालती देखील या साखरपुड्याला उपस्थित असणार आहे. मीरा कपूर देखील या साखरपुड्याला हजेरी लावणार असल्याची चर्चा होत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना नुकतचं मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. विमानतळावरील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Gautami Patil Dances Video: ‘घुंगरु’ घेऊन गौतमी पाटील लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

आता नवी दिल्लीत त्यांचा साखरपुडा होणार नाही तर लंडनमध्ये होणार आहे, दोघांच्याही घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘चश्मिश’ असं लिहिले आहे. राघव चढ्ढा यांना चश्मा असल्याने चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे की,तू राघव चढ्ढा यांना चश्मिश म्हणतेस का? असा सवाल केला जात आहे.

परिणीतीचे चित्रपट
इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube