ST Bank Election : सदावर्तेंनी करून दाखवलं ! एसटी बँक निवडणुकीत पॅनलचा एकतर्फी विजय

  • Written By: Published:
ST Bank Election : सदावर्तेंनी करून दाखवलं ! एसटी बँक निवडणुकीत पॅनलचा एकतर्फी विजय

एसटी बँक निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या पॅनलचा पराभव करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने बाजी मारली. सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाचा सर्व १९ जागांवर विजय झाला एसटी महामंडळातील प्रस्तापित संघटनांना सदावर्ते यांच्या पॅनलने मोठा धक्का दिला आहे. (st-bank-election-one-sided-victory-of-sadavarte-panel)

राज्यभरात ही निवडणूक २३ जून रोजी पार पडली. या निवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. निवडणुकीपूर्वी सदावर्ते म्हणाले होते कि या निवडणुकीत सर्वांच्या सर्व जागा निवडून आणेल आणि सदावरतेंनी ते करून दाखवलं.

कोरोना महामारिनंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण, ७ वा वेतन आयोग अशा मुख्य मागण्यांसाठी सुमारे साडे पाच महिने चाललेल्या एसटी कामगारांचा संपाचा परिणाम एसटी बँकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे.

बीआरएसची धडकी! ताफा पंढरपुरात येण्याआधीच नाना पटोले म्हणाले, ही तर…

राज्यातील विविध पक्षांच्या प्रस्तापित कामगार संघटनांना दूर करत नव्याने एसटी महामंडळात आलेल्या दोन संघटनांनी प्रचंड मुसंडी मारली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा ही जादा मतदान घेतले आहे. यातही सदावर्ते यांच्या पॅननले एकतर्फी विजय मिळवला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube