बीआरएसची धडकी! ताफा पंढरपुरात येण्याआधीच नाना पटोले म्हणाले, ही तर…
Nana Patole On BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष पंढरपुरात दाखल होण्याआधीच काँग्रेसला धडकी भरल्याचं दिसून येत आहे. कारण आगामी निवडणुकांमध्ये बीआरएस पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढवणार असल्याचं घोषित झालंय.
विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’
आता केसीआर यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. यंदाच्या आषाढी वारीला केसीआर यांच्यासह बीआरएस पक्षाचा ताफा पंढरपुरात दाखल होणार आहे. केसीआर यांच्या पंढरपुर दौऱ्यावरुन नाना पटोलेंनी निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले, तेलंगणामध्ये बीआरएसची भाजपची ‘बी’ टीम आहे. तेलंगणात बीआरएसला मोठं खिंडार पडलं असून अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. गुजरातससारखाच तेलंगणा पॅटर्न असून तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
‘ही दोस्ती तुटायची नाही…’; विखे – जगताप पुन्हा एकत्र
बीआरएसने तेलंगणामध्ये मागासवर्गीय, वंचित घटकांसाठी ठोस असं काहीही केलेलं नाही. बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा उपयोग होणार नाही. कांदा उत्पादकांची तेलंगणामध्ये फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. केसीआर यांचं सरकार फक्त मोठ्या जाहिराती देऊन काम केल्याचा डांगोरा पिटत असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, यंदाच्या आषाढीला केसीआर बाहेरुन पंढरपुरात येत गर्दी करताहेत हे बरोबर आहे काय? पंढरपूरचा विठोबा श्रद्धेचा विषय, त्याचा कोणी फायदा उठवत असेल तर योग्य नसल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.