विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’
Aashadhi Wari 2023 : बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा धडाका लावला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादी मधील अनेक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. उद्या केसीआर पंढरपूरमध्ये येऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या स्वागताचे ठिकठिकणी बॅनर लागले आहेत. पण त्यांच्या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये केसीआर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास मटणाचा बेत ठेवण्यात आला आहे.
बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आषाढी वारीनिमित्त असलेल्या दौऱ्यासाठी केसीआर तेलंगणातून 600 गाड्यांचा ताफा घेऊन आले आहेत. मात्र त्यापूर्वी आज धाराशिवमधील मुरुम येथे त्यांच्यासह त्यांचं मंत्रिमंडळ आणि नेतेमंडळींसाठी उस्मानाबादी बोकडाच्या मटणाची सोय करण्यात सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय आवडीनुसार चिकनदेखील ठेवण्यात आलेले आहे. संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन केसीआर यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्रात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापुर्वी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचे बेत आखल्या जात आहेत. बॅनर वर पांडुरंगाचे फोटो तर मटणावर ताव हाणून पंढरीत आगमन ? @TelanganaCMO पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करू नका.🙏🏼😔 pic.twitter.com/4kcoKMjiqo
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 26, 2023
उद्या केसीआर पंढरपूरात येऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार होती. मात्र राज्य शासनाने ही परवानगी नाकारली आहे. मटण खाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार असल्याने चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचा निर्णय सुप्रिया सुळेंच्या कोर्टात? शरद पवारांचे सूचक विधान
दरम्यान, सहाशे गाड्यांचा ताफा घेऊन केसीआर हे सोलापुरात दाखल झाले आहेत. आज दिवसभर ते धाराशिव येथे असून उद्या पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते तुळजापूर येथीही तुळजाभवानी देवीचं दर्शन घेणार आहेत. आज त्यांचा सोलापुरात मुक्काम आहे.