नगरमध्ये शुक्रवारी निर्भय बनो सभा; अ‍ॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरींची उपस्थिती

नगरमध्ये शुक्रवारी निर्भय बनो सभा; अ‍ॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरींची उपस्थिती

Ahmednagr News : नगर शहरातील माऊली संकुल सभागृह येथे निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्यावतीने (Ahmednagar News) निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा येत्या १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता माऊली सभागृहात होणार आहे. या सभेत ड. विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे प्रमुख वक्ते आहेत. अॅड. निशा शिवूरकर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असतील.

देशातील लोकशाही ही अधिक प्रबळ व्हावी व देशात संविधानाप्रमाणे सुशासन असावे या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी एकत्रित येत निर्भय बनो चळवळ सुरू केली आहे. देशातील सध्याच्या वातावरणात लोकशाहीला मारक असून संविधानाची पायमल्ली होत आहे. अलिखित आणीबाणी आणि हुकुमशाही सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्म आणि जातीच्या आधारे देशात द्वेषपूर्ण वातावरण पसरविण्यात येत आहे.

माफियांना पोसणारा देवेंद्र फडणवीसच; निखिल वागळेंचा थेट नाव घेत घणाघात

कृषी मालाला योग्य भाव नसल्याने व उत्पन्न खर्च वाढल्याने शेतकरी अधिक कर्जबाजारी होत आहेत आणि आत्महत्या करत आहेत, बेरोजगारीमुळे तरुणवर्ग त्रस्त आहे. महिला अत्याचारावर सरकार मौन आहे तर महागाईचा आगडोंब उसळला आहे. भ्रष्टाचार, फोडाफोडीचे राजकारण आणि राजकारणातील संधिसाधूपणामुळे नागरिकांच्या मुलभूत हक्क अधिकारांची पायमल्ली होत आहे.

याबाबत जनजागृती करण्याकरिता या चळवळीच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आतापर्यंत ५५ पेक्षा अधिक सभा झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता माऊली सभागृहात नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने संध्या मेढे, युनूस तांबटकर, ॲड. श्याम आसावा, ॲड. संतोष गायकवाड, अशोक सब्बन, आनंद शितोळे, फिरोज शेख, भैरवनाथ वाकळे आदींनी केले आहे.

भाजपचं काम अपूर्णच, पूर्ण करा नाहीतर मला बोलवा; वागळे प्रकरणी राणेंच्या खुलेआम सूचना

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज