आम्ही ‘डंके की चोट पे’ संचालक आहोत; गुणरत्न सदावर्तेंनी नेमकं खरं काय ते सांगितलं…
Gunratna Sadavarte : आम्ही डंके की चोट पे संचालक असून अद्याप संचालक पद रद्द झालं नसल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केलायं. दरम्यान, एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीरपणे पोटनियम मंजूर करण्यासह इतर बेकायदेशीर कार्यवाहींप्रकरणी सहकार खात्याने सदावर्ते पती-पत्नी दोघांचेही संचालकपद रद्द केले असल्याची माहिती समोर आलीयं. मात्र, अशा प्रकारची कुठलीही कारवाई झाली नसल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांच्या वक्तव्याने काँग्रेस नेते सुखावले; वडेट्टीवार म्हणतात, “आता NDA चा सुपडा साफ…”
एसटी बॅंकेच संचालक पद ठराव कोणीही रद्द केलेलं नसून चुकीच्या माहितीच्या आधारे पत्रकारांना उल्लू बनवण्याचं काम राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या बगलबच्च्यांनी केलं आहे. मागील 70 वर्ष ते संचालक पदावर होते, आता कष्टकरी जनतेने त्यांना लाथाळलं असून बरोबर काल सुप्रिया सुळे यांची निवडणूक संपल्यानंतरच हा विचार पुढे आला आहे. हा भारत एक हिंदुराष्ट्र असून नथुराम गोडसे यांना मानणारा आहे. जो कष्टकरी शरद पवारांसोबत होता तोच आता मोदींसोबत गेल्याने तणावातून शरद पवार यांच्या बगलबच्च्यांनी हे केलं असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे.
या लोकांना एसटी बॅंक बुडाली, कर्ज वाटप थांबवलं असं खोटं सांगितलं, पण आम्ही डंके की चोट पे संचालक आहोत, कोणताही ठराव अद्याप रद्द झालेला नाही. पत्रकारांना उल्लू बनवत आहेत. सहकार खात्याचा आदेश तुम्ही मागवून घ्या, पत्रकारांनी डोळसपणे पाहिलं पाहिजे, हे सगळं थोतांड असून विश्वास ठेवण्यालायक नसल्याचं गुणरत्न सदावर्तेंनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेची झलक! AI नियंत्रित लढाऊ जेटची कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात घेतली चाचणी
बारामतीमधील एसटीमधील कष्टकरी शरद पवारांच्या विरोधात दिसला आहे. नामांतर, दाऊद प्रकरण, दत्ता सामंत हत्यावेळी हेच लोकं सत्तेत होते. आमचा त्यांच्यासोबत वैचारिक आक्षेप आहे, ज्या कष्टकरी जनतेला ते वापरत होते ते आता त्यांचे राहिलेले नाहीत त्यामुळेच त्यांना आग लागत आहे. त्यातूनच शरद पवारांच्या बगलबच्च्यांकडून हे केलं असून आम्ही याविरोधात अब्रुनूकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सदावर्तेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यानंतर सहकार खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार बँकेचे तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नींची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणला तो ठरावही सहकार खात्याने रद्द केला. त्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत.