‘…आणि राजकीय हौस पूर्ण झाली की जातील’, जरांगेंच्या आंदोलनावर काय म्हणाले सदावर्ते?

Gunratna Sadavarte criticises Manoj Jarange on Maratha reservation after protest permission : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास अटी-शर्थींसह परवानगी मिळाली आहे. जरांगे यांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करु नये असे आदेश 26 ऑगस्ट रोजी दिले होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना विविध अटी – शर्थीसह एका दिवसासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी दिली गेली आहे.
जात सोडावी अन् आरक्षण घ्यावे; जरांगे पाटलांना माजी आमदार लक्ष्मण मानेंचा आव्हान
आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “नोटीफाईड झालेल्या नियमांच्या व्यतिरिक्त जरांगेंना काही करता येणार नाही. जरांगे मुंबईत येतील, मैदानात बसतील आणि त्यांची राजकीय हौस पूर्ण झाले की जातील”, अशी टीका सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर केली आहे.
काय म्हणाले सदावर्ते?
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले की, नोटीफाईड झालेल्या नियमांच्या व्यतिरिक्त जरांगेंना काही करता येणार नाही. महाराष्ट्रत सद्सदविवेकबुद्धी असणाऱ्या कुणीच जरांगेची बाजू घ्यायला तयार नाही. जरांगेनी मुख्यमंत्र्याचा अपमान केला, महिलांचा अपमान केला, लोकांच्या आया-बहिणी काढल्या. जरांगे म्हणाले की, कोणत्या रक्ताचे आहेत? अशा प्रकारचं महिलांच्या बाबतीत अपमानास्पद बोलणं या वक्तव्यांचा सुप्रियाताई निषेध व्यक्त करणार आहे का” पुढे सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले की, “जरांगे हे घाबरतात पण खूप आणि त्यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे. जरांगेचे वागणे म्हणजे झलक दिख ला जा आहे” अशा शब्दांत सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली आहे.
मोठी बातमी! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर; ‘या’ प्रकरणात मिळाला जामीन
जरांगेंना कायद्याचं बंधन
जरांगे यांनी कायद्यानुसारच आंदोलन करावं असं सांगताना सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले की, “जरांगे यांची नियत जर चांगली असली असती तर ते मा. न्यायमुर्तींच्या शिंदे समितीसमोर गेले असते. जर कायदा समजत नसेल तर तो कोणाकडून समजून घेतला पाहिजे. परंतू कायद्याबाहेरच्या गोष्टी करणं हा षडयंत्राचा भाग होतो. इतर सर्वांना आंदोलनासाठी जे कायदे लागू आहेत तेच जरांगे यांनाही लागू आहेत. जरांगेंना कायद्याचं बंधन आहे हे सुद्धा आम्ही डंके की चोट वर सांगत आहोत”. पुढे सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले की, “प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. येतील, मैदानात बसतील आणि जातील. जरांगेंची राजकीय हौस पूर्ण झाले की तोही जाईल”.