‘भाजपचं राजकारण की व्यवसाय माहित नाही’; राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचे खडेबोल

‘भाजपचं राजकारण की व्यवसाय माहित नाही’; राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचे खडेबोल

Sharad Pawar Speak On Ram Mandir : राम मंदिराच्या (Ram Mandir) मुद्द्यावरुन भाजप (BJP) राजकारण करतंय की व्यवसाय हे माहित नसल्याचे खडेबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुनावले आहेत. राम मंदिराचा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता शरद पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.

‘सालार’ची परदेशातही क्रेझ, चित्रपट पाहण्यासाठी थेट जपान ते हैदराबाद केला प्रवास

शरद पवार म्हणाले, अयोध्येत राम मंदिर झाल्याचा आम्हाला आनंदच आहे. ज्यावेळी बाबरी पडली होती, तेव्हा तिथे एकच पक्ष अस्तित्वात होता. सध्या भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करीत आहे की व्यवसाय हे माहिती नसल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.

राम मंदिराचा मॅप आला समोर! 70 एकरच्या एरियात भक्तांना मिळणार ‘या’ सुविधा; सचिवांनी दिली माहिती

सत्तापालट झाल्यावर विचार करणार :
सध्या देशात विरोधकांना नाउमेद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. केंद्रीय यंत्रणा ईडी, सीबीआयचा वापर सत्ताधाऱ्यांकडून अस्त्र म्हणून केला जात आहे. उद्याचं सोयीचं राजकारण करण्यासाठी भाजपकडून असा वापर केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला आहे. तसेच उद्या सत्तापालट झाल्यावर आम्हाला विचार करावा लागणार आहे की, यामध्ये काही दुरुस्त करण्याचा विचार आम्हाला करावा लागणार असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.

‘तुम्ही अयोध्येला आले किंवा नाही काही फरक पडणार नाही’, विखेंचा ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी पाच राज्यांत विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत पाचपैकी तीन राज्यात इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. मात्र, आम्ही एकत्र लढलो तर यश नक्की मिळणार असल्याचा विश्वास शऱद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधान करण्यासाठी कोणाचाही विरोध नसून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नाराज असल्याची बातमी खोटी असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधानपदाचा चेहरा नसला तरीही फरक पडणार नाही :
मोदींच्या विरोधात चेहरा नाही ठीक आहे, त्यांना तसं वाटतं. ते टीका करू शकतात. मात्र, निवडणुक लढवण्यासाठी चेहऱ्याची आवश्यकता असल्याचं काही कारण नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही. १९७७ सालच्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी कोणताही चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता. निवडणुक झाल्यावर मोरारजी देसाई यांची निवड करण्यात आली. देसाईंचा चेहरा वापरून १९७७ सालची निवडणूक लढली गेली नाही. त्यामुळं २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील पंतप्रधान पदासाठी चेहरा जाहीर न केल्यास काही फरक पडणार नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube