शरद पवारांकडून मुरकुटेंना राष्ट्रवादीची ऑफर… मुरकुटेंनी स्पष्ट केली भूमिका
Bhanudas Murkute : अहमदनगर जिह्यांतील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी काही दिवसांपूर्वी बीआरएसमध्ये (BRS) प्रवेश केला होता. आता त्यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश होणार या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर मुरकुटे यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात जाणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा असून या सर्व चर्चा निरर्थक आहेत. आपण असा कोणताही निर्णय घेतला नाही आहे. आपण आपली राजकीय भूमिका बदलली नसल्याचे सांगत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानुषंगाने आता राजकीय मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यातील माजी आमदार भानुदास मुरकुटे हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते काही महिन्यांपूर्वी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात गेले होते पण आता ते राष्ट्रवादीत येणार असून शिर्डीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांचा प्रवेश होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. यावर मुरकुटे यांनी आपलू भूमिका स्पष्ट केली आहे.
Mumbai News : शरद पवारांबाबत वादग्रस्त लिखाण; उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेमकं काय म्हणाले मुरकुटे?
लेटसअप मराठीशी बोलताना मुरकुटे म्हणाले, आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार या सर्व अफवा आहेत. मी बीआरएस पक्षात आहे व आपण आपली राजकीय भूमिका बदलली नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले, राजेंद्र फाळके व अँड.संदीप वर्पे यांचे व माझे जुने स्नेहसंबंध आहेत. ते श्रीरामपूरला आले असता त्यांनी केवळ स्नेहभेट दिली. यादरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
Pune : अजित पवारांच्या गटाविरोधात भाजप-शिवसेना एकवटले; 800 कोटींच्या निधीवरुन घेतला पंगा
शरद पवारांचा निरोप मिळाला मात्र…
माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित नुकतेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्त्यांचा मेळावा शासकीय विश्रामगृहात झाला होता. दरम्यान आमदार तनपुरे यांनी मुरकुटे यांची भेट घेतली होती. मुरकुटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा असा निरोप पवार यांनी तनपुरे यांच्यामार्फत आपल्यापर्यंत पाठवला होता. मात्र आपण स्पष्ट नकार दिला आहे. तसेच भविष्यातही आपला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही मानस नसल्याचे यावेळी मुरकुटे यांनी स्पष्ट केले.