कियारा नाही तर ‘ही’ अभिनेत्री होणार ‘भूल भुलैया 3’ची मंजुलिका; कार्तिकने थेट रिलीज डेट केली जाहीर

कियारा नाही तर ‘ही’ अभिनेत्री होणार ‘भूल भुलैया 3’ची मंजुलिका; कार्तिकने थेट रिलीज डेट केली जाहीर

Bhool Bhulaiya 3 Release Date Out: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यनने (Karthik Aaryan) ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiya) फ्रँचायझीच्या दुसऱ्या भागात त्याच्या कामाने सर्वांची मने जिंकली. अशा परिस्थितीत आता हा अभिनेता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiya 3) मधील मुख्य अभिनेत्रीची जोरदार चर्चा आहे. रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. ‘भूल भुलैया 2’ मध्ये कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)


मात्र, काल या भूमिकेसाठी सारा अली खानचे (Sara Ali Khan) नाव पुढे आले. मात्र आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. कार्तिक आर्यनने (Karthik Aaryan) नुकतचं एक पोस्ट शेअर करून मुख्य अभिनेत्रीची माहिती दिली आहे. यासोबतच त्याने ‘भूल भुलैया 3’ची रिलीज डेटही सांगितली आहे.

विद्या बालन ‘भूल भुलैया 3’ चा भाग असणार: कार्तिक आर्यनने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात विद्या बालन (Vidya Balan) ‘भूल भुलैया 3’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. कार्तिक आर्यनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आणि हे घडत आहे. ओजी मंजुलिका चक्रव्यूहाच्या दुनियेत परतत आहे. विद्या बालनचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. ‘भूल भुलैया 3’ या दिवाळीत हिट होणार आहे.

तब्बूची जागा घेण्यात आली: 2007 मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि विद्या बालन स्टारर चित्रपट ‘भूल भुलैया’ रिलीज झाला होता. यामध्ये शायनी आहुजा, राजपाल यादव, अमिषा पटेल यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटाची कथा आणि संगीतही सुपरहिट झाले होते. यानंतर 2022 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात आला. ज्यामध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांनी काम केले होते.

‘लग्न कल्लोळ’मधलं थिरकायला लावणारं ‘झणझणल्या काळजावर’ गाणं प्रदर्शित

कार्तिकने या चित्रपटात रूह बाबाची भूमिका साकारली होती, तर तब्बू दुहेरी भूमिकेत होती. “भूल भुलैया 3” बद्दल बोलायचे तर भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. प्रेक्षकांना चित्रपटात जबरदस्त थ्रिल आणि हास्याचा डोस मिळणार आहे. अनीस बज्मी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मार्चमध्ये सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज