‘लग्न कल्लोळ’मधलं थिरकायला लावणारं ‘झणझणल्या काळजावर’ गाणं प्रदर्शित

‘लग्न कल्लोळ’मधलं थिरकायला लावणारं ‘झणझणल्या काळजावर’ गाणं प्रदर्शित

lagnna kallol Movie : सिद्धार्थ जाधव आणि मयुरी देशमुखच्या लग्नाचा कल्लोळ (lagnna kallol Movie) चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील झणझणल्या काळजावर हे गाणं नूकतचं प्रदर्शित झालं आहे. या चित्रटातील गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गाण्यामध्ये मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दिसत आहेत. चित्रपटातलं हे धमाकेदार गाणं प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलं आहे.

झणझणल्या काळजावर या गाण्याला जय अत्रे यांचे जबरदस्त बोल आणि प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रिन्स याने केले आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवचा एक वेगळाच लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या गाण्यातून त्याच्या काळजातील मयुरीविषयीची भावना, प्रेम तो व्यक्त करत आहे. हे जबरदस्त गीत ऐकायला जितके मस्त वाटते तितकेच पाहायलाही कमाल आहे.

भाजपचं काम अपूर्णच, पूर्ण करा नाहीतर मला बोलवा; वागळे प्रकरणी राणेंच्या खुलेआम सूचना

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर ‘लग्नकल्लोळ’चे दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॅा. मयुर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे यांनी केले आहे. जितेंद्रकुमार परमार लिखित हा चित्रपट येत्या 1 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अतिशय एनर्जेटिक असे हे गाणे असून सिद्धार्थ जाधव, आदर्श शिंदे ही जोडी एकत्र आल्याने या गाण्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. या गाण्याच्या शब्दांनी आणि संगीताने अधिकच भर टाकली आहे. तसेच सिद्धार्थ आणि मयुरीची अफलातून केमिस्ट्री या गाण्यातून दिसत आहे. मला आशा आहे, पहिल्या गाण्याप्रमाणेच हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्वास डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी व्यक्त केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज