Ek Daav Bhutacha :’एक डाव भुताचा’ चित्रपटातील ‘वाजणार गं गाजणार गं’ धमाकेदार गाणं रिलीज

Ek Daav Bhutacha :’एक डाव भुताचा’ चित्रपटातील ‘वाजणार गं गाजणार गं’ धमाकेदार गाणं रिलीज

Vajnaar Ga Gajnaar Ga Song: गायक अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांच्या आवाजतलं “वाजणार गं गाजणार गं….” हे गाणं “एक डाव भूताचा” (Ek Daav Bhutacha Movie) या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. (Marathi Movie) 4 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातलं हे गाणं सोशल मीडियाद्वारे (Social Media) लाँच करण्यात आलं. सिद्धार्थ जाधवबरोबर (Siddharth Jadhav) मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)


रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी एक डाव भूताचा या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधवबरोबर मयुरी देशमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांनी या पूर्वी अनेक हिट गाणी दिली आहेत. आता उत्तम शब्द, संगीत असलेल्या “वाजणार गं गाजणार गं…” या गाण्याची त्यात भर पडणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता 4 ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागणार आहे.

डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

Marathi Movie: बाहुबलीच्या ‘कालकेय’ची मराठीत एंट्री, अभिनेता झळकणार मराठी चित्रपटात

सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube