Letsupp Exclusive : भाजपचे महाराष्ट्रातील 8 उमेदवार उद्या फिक्स होणार!

Letsupp Exclusive : भाजपचे महाराष्ट्रातील 8 उमेदवार उद्या फिक्स होणार!

BJP Issues List Of Observers For 23 Constituencies : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) काही दिवसांवरच येऊन ठेपली असून, निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप संसदीय मंडळाची दोन दिवसीय बैठक उद्या आणि परवा (दि.29 आणि दि. 1 मार्च) रोजी पार पडणार आहे. यात मोदींसह 100 उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असून, यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे या यादीत महाराष्टातील कोणते उमेदवार असणार याची उत्सुकता वाढली असून, गोपाळ शेट्टी, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे आदींची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.

Rutuja Bagwe: मराठमोळ्या ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांच्या चर्चा सुरु आहेत. यामध्ये विशेषत: गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे अग्रस्थानी असून, आता राज्यातील 23 लोकसभां जागांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व तर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तर, दुसरीकडे भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या 23 जागांवरील निरीक्षकांच्या निवडीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. परंतु, जाहीर करण्यात आलेले निरीक्षक हे केवळ भाजपच्या दोन दिवसीय बैठकीचे नियोजन करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात निवडण करण्यात आलेल्या या निरीक्षकांचा आणि लोकसभा निवडणुकांचा संबंध आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कोणाला कोणत्या मतदार संघाची जबाबदरी?

भिवंडी – योगेश सागर, गणेश नाईक, धुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदे,  नंदरुबार- संजय भेगडे, अशोक उके, जळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहे, रावेर- हंसराज अहिर, संजय कुटे, अहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदे, जालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंह, नांदेड-जयकुमार रावल, सुभाष देशमुख, बीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईक, लातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळ, माढा- भागवत कराड, प्रसाद लाड

हिमाचलमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले; भाजपच्या हर्ष महाजन यांना राज्यसभेची ‘लॉटरी’, सिंघवी पराभूत

सांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील, नागपूर- मनोज कोटक, अमर साबळे, भंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघ,  गडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटील, वर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, अकोला- संभाजी पाटील, विजय चौधरी, दिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकर उत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकर, उत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरे, उत्तर मध्य मुंबईची जबाबदारी धनंजय महाडिक आणि राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube