Rutuja Bagwe: मराठमोळ्या ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

Rutuja Bagwe: मराठमोळ्या ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

Rutuja Bagwe Sangeet Natak Akademi Award: संगीत नाटक अकादमीचे हे पुरस्कार (Sangeet Natak Akademi Award) नाट्यक्षेत्रातील युवा पुरस्कार आहेत, ते भारतभरात नाटकात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांना दिले जातात. ते नाट्यवर्तुळात प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जातात. त्यामुळे मराठमोळ्या अभिनेत्री ऋतुजा बागवेला (Rutuja Bagwe) नाट्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तिचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

तसेच ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना देखील संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (Sangeet Natak Akademi Award) जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर आता अभिनेत्याला संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने यांचा गौरव करण्यात येणार आहे. नुकतीच संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

BREAKING : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर!

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी: अशोक सराफ (अभिनय), विजय शामराव चव्हाण, (ढोलकीवादक), कलापिनी कोमकली (हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत), नंदिनी परब गुजर (सुगम संगीत), सिद्धी उपाध्ये (अभिनय), महेश सातारकर (लोकनृत्य), प्रमिला सूर्यवंशी (लावणी), अनुजा झोकरकर ( हिंदुस्तानी शास्त्रीय गायक), सारंग कुलकर्णी ( सरोद वादक ), नागेश आडगावकर (अभंग संगीत), ऋतुजा बागवे (अभिनय), प्रियांका शक्ती ठाकूर (पारंपारिक कला)

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेमार्फत प्रधान करण्यात येणारा पुरस्कार आहे. यामध्ये अनेक विविध कलाक्षेत्रामधील कलावंतांना देण्यात येणारा महत्वाचा पुरस्कार आहे. यामध्ये कलाक्षेत्रामधील योगदानांबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात. संगीत नाटक अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज