Songya Trailer: ‘एका लढवय्या मुलीची कहाणी’; सोंग्या सिनेमाचा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज

Songya Trailer: ‘एका लढवय्या मुलीची कहाणी’; सोंग्या सिनेमाचा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज

Songya Official Trailer: वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. (Songya Movie ) अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rituja Bagwe) आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanavare) ही जोडी ‘सोंग्या’ (Songya Marathi Movie) चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. नुकतचं या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)


या सिनेमात आपल्या समाजाच्या ज्या प्रथा- परंपरा आहेत, त्या आपल्या पूर्वजांनी बनवल्या आहेत. त्यांचे पालन करणं आपलं कर्तव्य आहे.” हा डायलॉग सोंग्या या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकू येतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये यशराज आणि शुभ्रा यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येते. अभिनेता अजिंक्य ननावरेनं सोंग्या या चित्रपटात यशराजची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की, शुभ्रा ही यशराज म्हणते, “मी प्रथा- परंपरा मानत नाही” पण त्यानंतर शुभ्रा आणि यशराज यांच्या प्रेमकथेमध्ये अनेक ट्वीस्ट येत असल्याचे बघायला मिळणार आहे.

‘चित्रपटात आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केले असलं तरी याआधी नाटकात आम्ही एकत्र काम केलं असल्याने आमच्यात चांगली मैत्री आणि बॉण्डिंग होतं त्याचा फायदा आम्हांला ‘सोंग्या’ चित्रपटातील आमच्या भूमिका करताना नक्की झाला, अशा भावना ऋतुजा आणि अजिंक्यने व्यक्त केल्या. हा सिनेमा “एका लढवय्या मुलीची कहाणी..सोंग्या ह्यो नेमका विषय काय असणार ?? असा चाहत्यांच्या मनात प्रश्न होता..आता प्रतीक्षा संपली !!”, असं कॅप्शन सोंग्या या सिनेमाच्या ट्रेलरला देण्यात आलं आहे. या सिनेमाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आली नाही.

TMKOC: ‘बंद करा हा शो..’ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले

सोंग्या या सिनेमात ऋतुजाचे आणखी काही आगामी सिनेमे रिलीज होणार आहेत. तिच्या ‘लंडन मिसळ’ या आगामी सिनेमाची देखील चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा सिनेमा 8 डिसेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ऋतुजासोबतच रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत साकारणार आहेत.

ऋतुजानं ‘शहीद भाई कोतवाल’ या मराठी सिनेमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. एका लग्नाची तिसरी गोष्ट, नांदा सौख्य भरे, चंद्र आहे साक्षीला या मालिकांमध्ये ऋतुजानं मुख्य भूमिका बजावली आहे. तिच्या अनन्या या नाटकाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube