Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Ashok Saraf: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील योगदानासाठी 2023 या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सरफा यांनी त्यांच्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनंदन करतांना सांगितले आहे.

 

मुख्यमंत्र्यांची पोस्ट

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले: अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.

Lagna Kallol: मयुरी नक्की कोणासोबत संसार थाटणार, ‘लग्न कल्लोळ’चा धमाकेदार टिझर रिलीज!

अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया: अशोक सराफ म्हणाले की, “मला थोड्या वेळापूर्वीच समजलं की, मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मला हा पुरस्कार मिळेल याची मला कल्पना देखील नव्हती. मी उत्तम काम करतो, तुम्हाला माझं काम आवडतं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंद देखील झाला आहे. माझी आतापर्यंतची धडपड सार्थक ठरली, असं मला वाटतंय. मी केलेलं काम प्रेक्षकांना कायम आवडलं पाहिजे, हाच हेतू मी कायम ठेवत असतो. प्रेक्षक आहेत तरच मी आहे. माझ्या प्रवासामध्ये आतापर्यंत मला सहाय्य केलं, त्या प्रत्येकाचेच मो मनापासून आभार मानतो. असे यावेळी अभिनेता अशोक सराफ यांनी सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube