‘इंडिया’ला मोठा झटका, काँग्रेस केवळ 37 जागा जिंकणार, काय सांगतो 543 जागांचा सर्व्हे?
Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. तर विरोधकही भाजपला (BJP) सत्तेतून खेचू असं सांगताहेत. दरम्यान, आता इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्व्हेत इंडिया आघाडीला मोठा झटका बसेल असा अंदाज वर्तवला.
‘पक्ष फोडण्याचा हिशोब मोदी अन् शाहांना द्यावा लागेल’; राऊतांचं खोचक प्रत्युत्तर
लोकसभेच्या निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसे वेगवेगळ्या संस्थाकडून जनतेला कौल जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीपूर्वी देशाचा मूड काय आहे? हे जाणून घेण्यासाठी, India TV-CNX ने 5 ते 23 फेब्रुवारी दरम्यान देशातील सर्व 543 लोकसभा जागांवर हे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्व्हेक्षणात 1 लाख 62 हजार लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये 84352 पुरुष आणि 78550 महिलांचा समावेश होता.
शिंदे गट आणि अजितदादा गटाला सिंगल डिजिट जागा? जागावाटपावर फडणवीस म्हणाले…
इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने केलेल्या ओपिनियन पोलनुसार, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला देशातील 543 लोकसभा जागांपैकी केवळ 98 जागा मिळू शकतात, असं सांगण्यात आलं. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागांचा समावेश नव्हता. कारण ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये एकला चलो रे चा नारा देत निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मात्र, तरीही त्या इंडिया आगाडीसोबत असल्याचं सांगण्यात येत आहे.
कॉंग्रेसला केवळ 37 जागा
या ओपिनियन पोलनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची ऐतिहासिक घसरण होण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 37 जागा जिंकता येतील.
देशात 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली नव्हती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हा कॉंग्रेसला मोदी लाटेचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे काँग्रेसला केवळ 42 जागा मिळाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत पक्षाने आपली कामगिरी सुधारली आणि 52 जागा जिंकल्या, आता 2024 च्या ओपीनियन पोलमध्येही कॉंग्रेसची घसरण होण्याची शक्यता वर्तवली.
भाजप आणि एनडीएचा सामना करण्यासाठी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी गेल्या वर्षी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र आता या इंडिया आघाडीत बिघाडी होतांना दिसून येते. तहीही कॉंग्रेस या आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत या सर्व्हेत सांगण्यात आलं.