Pawan Singh Asansol : गौतम गंभीर नंतर ‘या’ गायकाचा भाजपकडून तिकीट मिळूनही निवडणूक लढण्यास नकार

Pawan Singh Asansol : गौतम गंभीर नंतर ‘या’ गायकाचा भाजपकडून तिकीट मिळूनही निवडणूक लढण्यास नकार

Pawan Singh Asansol : टीम इंडियाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आता भोजपुरी गायक पवन सिंह ( Pawan Singh Asansol ) यांनी देखील भाजपकडून तिकीट मिळून देखील निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी 24 तासांच्या आत निवडणुक लढण्यास नकार दिला आहे.

‘या’ कारणामुळे निवडणुक लढण्यास नकार…

भोजपुरी गायक पवन सिंह यांनी देखील भाजपकडून तिकीट मिळून देखील निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. याचं कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. ते म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठांचे मनापासून आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. मात्र काही कारणास्तव मी आसनसोल या ठिकाणाहून निवडणूक लढू शकत नाही. असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Genelia Deshmukh : जेनेलियाचं ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट, वेड लावणाऱ्या लूकवर चाहते फिदा

दरम्यान भाजपने नॉर्थ ईस्ट दिल्लीतून मनोज तिवारी, युपीतील गोरखपूरमधून रविकिशन शुक्ला आझमगढधून दिनेश लाल निरहुआ यांना उमेदवारी दिली आहे. तर पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल येथून उमेदवारी देण्यात आली होती. कारण त्यांना बिहारमधून उमेदवारी हवी होती. तर यामागे पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांची स्थिती मजबूत असणे हे एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून त्यांनी 24 तासांच्या आत निवडणुक लढण्यास नकार दिला आहे.

‘वंचित’बरोबर आघाडी होणार? वडेट्टीवार म्हणाले, आता दोन दिवसांत तिन्ही पक्ष…

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची (Lok Sabha Election) पहिली यादी शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा (PM Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षाने गांधीनगर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा बुंदी मतदारसंघात नशीब आजमायचे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube