Lok Sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत नारायण राणेंनी मारली बाजी, विनायक राऊतांचा पराभव

Lok Sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत नारायण राणेंनी मारली बाजी, विनायक राऊतांचा पराभव

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result 2024 : भाजपाने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. मात्र ते स्वप्न निकालाच्या दिवशी पूर्ण होताना दिसत नाहीये. कारण भाजपाला वाटली होती तेवढी ही सोपी निवडणूक नाही. भाजपाला 300 ची संख्याही गाठणं कठीण जातं आहे. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी बाजी मारली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा पराभव झाला आहे. 24 व्या फेरीअखेर नारायण राणे 51 हजार 894 मतांनी आघाडीवर होते. नारायण राणे पाचव्या फेरीनंतर 4239 मतांनी आघाडीवर आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 4 लाख 55 हजार 24 मते पडली आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना 3 लाख 38 हजार 34 मते मिळाली आहेत. आणि विनायक राऊत यांचा पराभव झाला.

पाचव्या फेरीनंतर विनायक राऊत पिछाडीवर पडले आहेत. राज्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हायहोल्टेज लढतीपैकी एक होता. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक विनायक राऊत यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळाली. शिवाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नारायण राणेंसाठी सभा घेतली होती, त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली होती. चिपळूणमध्ये 1, 55,027 मतदारांनी मतदान केलं.तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 1,72,139 मतदारांनी मतदान केलं.राजापूर विधानसभा मतदारसंघात 1,41,033 तर कणकवली मतदारसंघात 1,50,320 मतदारांनी मतदान झाल्याचे पाहायला मिळाला आहे.

अमरावतीत नवनीत राणांचा पराभव, कॉंग्रेसच्या बळवंत वानखडेंनी दाखवला इंगा

तसेच कुडाळ मतदारसंघात 1,39,856 मतदारांनी मतदान केले. आणि सावंतवाडी या मतदारसंघात 1,49,243 मतदारांनी आपल हक्क बजावला आहे. त्यामुळे एकूण 62.52 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. तर, 0.5 टक्के इतकं पोस्टल मतदान झालं आहे.

2019 सालचा निवडणूक निकाल –

विनायक राऊत (शिवसेना) – 4,58,022

निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमानी) – 2,79,700

2019 साली विनायक राऊत विजयी झाले होते. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात राणे कुटुंबाचं प्राबल्य दिसतं. तर काही भागात शिवसेनेचं. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना, रत्नागिरीमध्ये सामंत कुटुंबीय तर चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ताकद दिसून येते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज